शरीरासाठी घातक ठरतं Uric Acid, जाणून घ्या कमी करण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 10:51 AM2023-07-31T10:51:13+5:302023-07-31T10:52:02+5:30

Uric Acid : काही खाद्यपदार्थांमध्ये प्यूरीन असतं. जे पचल्यानंतर यूरिक अ‍ॅसिड तयार होतं.

How to reduce high uric acid study suggest include 5 low purine foods in diet | शरीरासाठी घातक ठरतं Uric Acid, जाणून घ्या कमी करण्याचे उपाय

शरीरासाठी घातक ठरतं Uric Acid, जाणून घ्या कमी करण्याचे उपाय

googlenewsNext

Uric Acid : आजकाल लोकांच्या हात-पायांमध्ये वेदना होण्याची समस्या वाढली आहे. ज्यात सांधेदुखी सगळ्यात जास्त हैराण करते. ज्या लोकांची लाइफस्टाईल सुस्त असते आणि अनहेल्दी आहार घेतात, त्यांना तरूणपणातच या समस्यांचा सामना करावा लागतो. पण याने घातक हाय यूरिक अ‍ॅसिडही असू शकतं.

हाय यूरिक अ‍ॅसिडची लक्षण

काही खाद्यपदार्थांमध्ये प्यूरीन असतं. जे पचल्यानंतर यूरिक अ‍ॅसिड तयार होतं. जेव्हा हे अ‍ॅसिड रक्तात जास्त होतं तेव्हा जॉइंटमध्ये वेदना, सूज, आखडलेपणा, मळमळ, उलटी, पुन्हा पुन्हा लघवी, लघवीतून रक्त, किडनी स्टोन अशी लक्षण दिसू लागतात.

डाळी

डाळींमध्ये प्यूरीन भरपूर असतं. जे यूरिक अ‍ॅसिड बनवण्यासाठी ओळखलं जातं. पण यावर एनसीबीआयवर एक रिसर्च प्रकशित झाला की, डाळींमुळे किडनी स्टोन किंवा हात-पाय दुखण्याची समस्या होते का? यात आढळून आलं की, डाळी किंवा शेंगदाने खाल्ल्याने या समस्यांचा धोका वाढत नाही.

दूध

डाळींप्रमाणेच दुधाबाबतही हाच भ्रम होता की, याने संधिवात रोग वाढू शकतो. पण याने यूरिक अ‍ॅसिड बाहेर काढण्यास मदत मिळते आणि संधिवाताची वेदना कमी होऊ शकते.

कॉफी

कॉफीमध्ये अॅसिड असतं, पण स्टोन बनवणाऱ्या अ‍ॅसिडपेक्षा हे खूप वेगळं असतं. कॉफीने प्यूरीक तुटण्याची गति कमी होते. त्यामुळे संधिवात-स्टोनचे रूग्ण रोज कॉफी पिऊन फायदा मिळवू शकतात.

चेरी

चेरी खाऊनही यूरिक अ‍ॅसिड कमी केलं जाऊ शकतं. जर तुम्हाला जॉइंटमध्ये वेदना होते, तर यांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा. यांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे जॉइंटना हेल्दी ठेवतात.

पाणी

दररोज भरपूर पाणी प्यावे. याने संधिवात आणि किडनी स्टोनचा उपचार करण्यास मदत मिळते. रोज साधारण 2 ते 3 लीटर पाणी प्यावं.

Web Title: How to reduce high uric acid study suggest include 5 low purine foods in diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.