लगेच झोप लागण्याचा रामबाण उपाय, सैनिकही वापरतात ही ट्रिक; 2 मिनिटात येईल गाढ झोप!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 12:16 PM2023-06-03T12:16:18+5:302023-06-03T12:16:42+5:30
Sleep Trick : जर तुम्हालाही झोप येण्याची समस्या असेल तर आम्ही तुम्हाला आर्मी जवानांची एक ट्रिक सांगणार आहोत ज्याने तुम्हाला काही सेकंदात गाढ झोप लागेल.
Sleep Trick : झोपणं ही एक कला आहे या गोष्टीला तुम्ही मानता का? तुम्ही म्हणाल ही तर एक क्रिया आहे जी प्रत्येक व्यक्ती रोज करते. सगळेच झोपतात. अशात आज आम्ही सांगणार आहोत की, झोपणं ही एक कला कशी आहे. जगात असे बरेच लोक आहेत जे बेडवर पडताच त्यांना झोप येते, पण काही असेही लोक आहेत ज्यांना लगेच झोप येत नाही. जर तुम्हालाही झोप येण्याची समस्या असेल तर आम्ही तुम्हाला आर्मी जवानांची एक ट्रिक सांगणार आहोत ज्याने तुम्हाला काही सेकंदात गाढ झोप लागेल.
आर्मीच्या जवानांना एक अशी कला येते ज्याच्या मदतीने ते केवळ 2 मिनिटात गाढ झोपतात. वेबसाइट डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, 1981 मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं होतं 'रिलॅक्स अॅन्ड विन: चॅम्पियनशिप परफॉर्मेंस' (Relax and Win: Championship Performance).
या पुस्तकाचे लेखक लॉयड बड विंटर होते. लॉयड यांनी हे पुस्तक याकारणाने लिहिलं होतं जेणेकरून मैदानात उतरलेले खेळाडू चांगलं परफॉर्मन्स करू शकतील. तसेच त्यांना आराम मिळेल. या पुस्तकात झोपण्यासाठी एक खास ट्रिक लिहिली आहे. ज्याचा अमेरिकन सेना वापर करत आहे. या ट्रिकच्या माध्यमातून ते केवळ 2 मिनिटात गाढ झोप घेतात.
लवकर झोपण्याचा फॉर्मुला
ही ट्रिक एकदम साधी आहे आणि तुम्हाला ही फॉलो करण्यात अजिबात अडचण होणार नाही. ट्रिकची पहिली स्टेप ही आहे की, शरीर रिलॅक्स करणं. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला झोप येणार नाही. त्यानंतर चेहऱ्याच्या मसल्स रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. जबडा, जीभ, डोळे पूर्णपणे रिलॅक्स करा. काहीच हालचाल करू नका.
2 मिनिटात येईल झोप
यानंतर दोन्ही हात शरीराच्या समांतर ठेवा आणि खांदे लूज सोडा. याने तुमच्या शरीराचा सगळा तणाव दूर होईल. या सगळ्या प्रक्रियेत श्वासांची महत्वाची भूमिका आहे. श्वास घेताना आणि सोडताना छाती, हात-पाय सैल सोडा. एका पॉइंटला तुमच्या लक्षात येईल की, तुमचं शरीर रिलॅक्स झालं आहे. जेव्हा तुम्हाला हे जाणवेल तेव्हा 10 सेकंदापर्यंत एका अशा दृष्याबाबत विचार करता ज्याने तुम्हाला चांगलं वाटेल.
हे दृश्य तुमच्या जीवनात घडलेली एखादी घटना असू शकते. जर काही सुचत नसेल तर समुद्र किंवा तलावाच्या किनारी झोपले आहात असं इमॅजिन करा. तरीही तुमचं मन भटकत असेल तर सतत मनात बोलत रहा की, Don’t Think (विचार नको). तुमच्या लक्षात येईल की, तुम्हाला झोप येत आहे. ही प्रक्रिया तुम्ही सहा महिने करत रहाल तर तुम्हाला 2 मिनिटात झोप येईल.