केस गळतात, कोंडा झालाय, वाढत नाहीत...जास्तीत जास्त लोक 'या' गोष्टीकडे करतात दुर्लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 09:50 AM2024-06-01T09:50:51+5:302024-06-01T09:51:57+5:30
Hair Care Tips : डोक्याच्या त्वचेची काळजी घेतली गेली नाही तर बॅक्टेरिया आणि केमिकल्समुळे केसगळती होऊ लागते.
Hair Care Tips : महिला असो वा पुरूष आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना केसगळतीचा सामना करावा लागत आहे. कमी वयातच केस तुटणे किंवा गळणे अशा समस्या होत आहेत. याची कारणे वेगवेगळी आहेत. यात फंगल इन्फेक्शन, स्कीन इंन्फेक्शन हेही कारणं असतात. या दोन्हीं समस्यांमुळे केस मुळातून कमजोर होतात. डोक्याच्या त्वचेची काळजी घेतली गेली नाही तर बॅक्टेरिया आणि केमिकल्समुळे केसगळती होऊ लागते. अशात डोक्याच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे माहीत असलं पाहिजे.
डोक्याच्या त्वचेची काळजी
- डोक्याची त्वचा निरोगी ठेवायची असेल सगळ्यात महत्वाची बाब ठरते आहार. प्रोटीन, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचा डाएटमध्ये समावेश करावा. लो फॅट डेअरी प्रॉडक्ट, कडधान्य, फळं आणि हिरव्या भाज्यांचा संतुलित आहार घ्यावा.
- बरेच लोक केसांना रोज शाम्पू करतात. पण असं करणं चुकीचं असतं. आठवड्यातून 2 वेळा केसांना शाम्पू करा. केस पाण्याने धुवा. याने केसांवरील आणि डोक्याच्या त्वचेवरील धुळ निघून जाईल. डॅंड्रफपासूनही सुटका मिळेल.
त्वचा ऑयली असल्यास काय करावे?
- जर डोक्याची त्वचा ऑयली असेल तर चिकट केसांमध्ये तेल लावू नका. दुसऱ्यांचा कंगवा वापरू नका. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेलाने मालिश करा. डोक्याच्या त्वचेची मालिश केल्याने रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, तसेच मांसपेशींना आरामही मिळतो.
- चांगल्या क्वॉलिटीच्या अॅंटी-डॅंड्रफ आणि कंडीशनरचा वापर करावा. केसांवर केमिकल ट्रिटमेंट केल्याने डोक्याच्या त्वचेवर नकारात्मक प्रभाव पडतो. अशात डोक्याच्या त्वचेवर अॅलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन-ई ऑइल कॅप्सूल लावल्याने त्वचा चांगली राहते.
- डोक्याची त्वचा खराब झाली तर केस जास्त गळतात आणि कमी वेगाने वाढू लागतात. तसेच डॅंड्रफ आणि डोक्याची त्वचा कोरडी होऊन खिपल्याही निघू लागतात. हेल्दी डाएट, मेडिटेशनने ही समस्या दूर केली जाऊ शकते.
ऑलिव ऑइल गरजेचं
- ऑलिव ऑइल केसांसाठी आणि डोक्याच्या त्वचेसाठी फायदेशीर असतं. याने केसांना चमक मिळते. डोक्याच्या त्वचेवर जमा झालेल्या खिपल्या दूर होतात. त्यासाठी दोन चमचे ऑलिव ऑइलने डोक्याच्या त्वचेची मालिश करा.