उन्हाळ्यात नाकातून येणारं रक्त थांबवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 05:27 PM2024-03-07T17:27:09+5:302024-03-07T17:27:37+5:30
Nose Bleeding: नाकातून रक्त येताना दिसलं की अनेकदा ते बेशुद्ध होतात. त्यांना चक्कर येऊ लागते. भीषण तापमानामुळे नाकातून रक्त येऊ लागतं.
Home Remedies for Nose Bleeding: उन्हाचा पारा वाढायला लागला की, अनेक लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या होते. जर वेळीच यावर उपाय केला नाही तर समस्या होऊ शकते. नाकातून रक्त येताना दिसलं की अनेकदा ते बेशुद्ध होतात. त्यांना चक्कर येऊ लागते. भीषण तापमानामुळे नाकातून रक्त येऊ लागतं.
नाकातून रक्त येण्याची कारणे
नाकातून रक्त येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, अॅलर्जी, आतील नसा किंवा ब्लड वेसल्स डॅमेज असणं, जास्त उष्णता, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, सायनस, मलेरिया, टायफॉइड, जास्त शिंका इत्यादी. पण याला फार घाबरण्याची गरज नाही. जर तुम्हाला कामानिमित्त जास्त बाहेर जावं लागत असेल तर काही उपाय तुम्हाला माहीत असले पाहिजे. याने लगेच नाकातून येणारं रक्त बंद होतं.
- व्यक्ती नाकातून रक्त येऊ लागलं तर त्याला लगेच खाली जमिनीवर झोपवा. जेणेकरून नाकातून येणारा रक्तप्रवाह बंद होईल. याने चक्कर येणे, घाबरल्यासारखं वाटणे, भीती याची समस्या दूर होतील.
- एसेंशिअल ऑइलनेही सुद्धा ही समस्या रोखली जाऊ शकते. यासाठी तुम्ही लॅवेंडर ऑइलचे काही थेंब एक कप पाण्यात टाका. पाण्यात पेपर टॉवेल भिजवून बाहेर काढा आणि त्याचं पाणी पिळून घ्या. हा पेपर नाकावर ठेवा. तुम्ही या पाण्याचे काही थेंबही नाकात टाकू शकता. याने तुम्हाला फायदा होईल.
- नाकातून रक्त येत असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर थंड पाणी टाकावं. एक कपड्यात बर्फ गुंडाळून तो नाकावर काही वेळासाठी लावून ठेवा. याने नाकातून येणारं रक्त लगेच बंद होईल.
- कांद्याच्या रसानेही नाकातून येणारं रक्त थांबवलं जाऊ शकतं. कांद्याचा थोडा रस काढा. कापसाच्या बोळ्याने हा रस नाकाला लावा आणि दोन-तीन मिनिटे तसाच राहू द्या. तसेच कापलेला कांदा नाकाजवळ धरला तर त्यानेही ब्लड क्लॉटिंगसाठी मदत मिळते.
- व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तुमच्या चेहऱ्याचं आणि केसांचं सौंदर्य वाढवते. या कॅप्सूलमधील ऑइल नाकावर कापसाच्या मदतीने लावा आणि थोड्या वेळासाठी व्यक्तीला बेडवर झोपवला. जेव्हाही नाक ड्राय वाटेल या तेलाचा वापर करा. याने त्वचेवर ओलावा निर्माण होतो. याने नाकातून येणारं रक्तही बंद होतं.