Stop Overthinking Trick: खूप विचारात असता! जबरदस्त ट्रिकने मोडा ही वाईट सवय; पठ्ठ्याने सांगितला सुटकेचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 09:25 AM2022-05-25T09:25:32+5:302022-05-25T09:26:01+5:30

how to Stop Overthinking : छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप विचार करत बसतात. डोक्याच काहूर माजलेले असते. गरजेच्या नसलेल्या गोष्टीदेखील मनात येत राहतात. यापासून सुटका कशी करून घ्यायची...

how to Stop Overthinking: Too much thinking! dont worry This Trick will help you rid of it trending | Stop Overthinking Trick: खूप विचारात असता! जबरदस्त ट्रिकने मोडा ही वाईट सवय; पठ्ठ्याने सांगितला सुटकेचा मार्ग

Stop Overthinking Trick: खूप विचारात असता! जबरदस्त ट्रिकने मोडा ही वाईट सवय; पठ्ठ्याने सांगितला सुटकेचा मार्ग

googlenewsNext

आजकाल लोक खूप विचारात असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप विचार करत बसतात. डोक्याच काहूर माजलेले असते. गरजेच्या नसलेल्या गोष्टीदेखील मनात येत राहतात. यामुळे तो कायम अस्वस्थ राहतो व झोपही शांत लागत नाही. अनेकदा दुसऱ्याच्या बाबतीत घडलेल्या गोष्टींवरूनही माणसे आपल्या समजून विचार करू लागतात. यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. यामुळे आजुबाजुच्या किंवा सोबत राहणाऱ्या लोकांनाही याचा त्रास होऊ लागला आहे. अशा मुळे त्रस्त असलेल्या लोकांनी आता जास्त विचार करण्याची गरज नाहीय. एका व्यक्तीने यापासून सुटका करून घेण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक सांगितली आहे. 

या व्यक्तीच्या दाव्यानुसार ही ट्रिक एवढी जबरदस्त आहे ही तुमचे डोक्यातील काहूर शांत होऊन जाईल आणि विचारांची साखळी तुटेल. यामुळे तुम्ही तुमच्या कामात लक्ष केंद्रीत करू शकता. एक प्रसिद्ध टिकटॉक पेज 'The Mental Level' वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओचे नाव 'Jedi mind trick' असे आहे. खालील कमेंटनुसार अनेकांनी ही ट्रिक वापरली आणि त्याचा त्यांना फायदाही झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती बोलताना ऐकायला येते. ''ही Jedi mind trick आहे जी तुमचे डोके पूर्णपणे हळू आणि शांत करू शकते. हे केल्यानंतर तुम्हीच हैराण होणार आहात. मेडिटेशन Eckhart Tolle द्वारे प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. तुम्ही तुमचा श्वास हळू घेण्यास सुरुवात करा आणि स्वत:ला विचारा की माझा पुढील विचार कोणता असणार आहे?'', असे यात म्हटले आहे. 

यानंतर तुम्ही दीर्घ श्वास घ्या, सोडा आणि आपले मसल्स रिलॅक्स करा. पुन्हा एकदा पुढील विचार काय असेल असे स्वत:ला विचारा. जोवर तुम्हाला पूर्णपणे आराम मिळत नाही तोवर हे करत रहा. काही वेळाने तुमच्या डोक्यातील विचारांची साखळी तुटली आहे आणि तुम्ही अनावश्यक विचारांपासून दूर गेलात हे जाणवेल, असे या व्यक्तीने म्हटले आहे. 

या काळात तुम्हाला एक गोष्ट आणखी करावी लागणार आहे, ती म्हणजे तुमच्याा मनातील विचारांचे काहुर शांत होत चाललेय का यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. यानंतर जी काही शांतता तुम्हाला मिळेल ती पूर्ण दिवसभर तुमच्यासोबत राहिल असा दावा करण्यात आला आहे. 
 

Web Title: how to Stop Overthinking: Too much thinking! dont worry This Trick will help you rid of it trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.