आवाज आणि गळ्याची कशी घ्यावी काळजी? डॉक्टरांनी सांगितले उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 01:12 PM2024-04-17T13:12:45+5:302024-04-17T13:14:24+5:30

तुमचा आवाज तुमच्या जीवनाचा प्रतिध्वनी असतो, तुमचा आवाज तुमचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य दर्शवतो. स्वर आरोग्याबाबतचा सर्वसमावेशक दृष्टिकोन यामधून अधोरेखित करण्यात आला आहे. 

How to take care of voice and throat? Remedy told by doctor | आवाज आणि गळ्याची कशी घ्यावी काळजी? डॉक्टरांनी सांगितले उपाय

आवाज आणि गळ्याची कशी घ्यावी काळजी? डॉक्टरांनी सांगितले उपाय

डॉ शमा कोवळे, ईएनटी सर्जन, व्हॉइस आणि स्वालोइंग स्पेशालिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई 

दरवर्षीप्रमाणे यावेळीही १६ एप्रिल रोजी जागतिक आवाज दिन साजरा केला गेला. दरवर्षी एक विशिष्ट विषय ठरवून स्वर आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली जाते. यंदाच्या वर्षीचा विषय रेजोनेट, एड्युकेट अँड सेलिब्रेट हा होता. आज आपण याच विषयाच्या अनुषंगाने स्वर आरोग्याविषयी चर्चा करू या. 

तुमचा आवाज तुमच्या जीवनाचा प्रतिध्वनी असतो, तुमचा आवाज तुमचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य दर्शवतो. स्वर आरोग्याबाबतचा सर्वसमावेशक दृष्टिकोन यामधून अधोरेखित करण्यात आला आहे. 

शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखले गेल्यास आवाजाचे आरोग्य देखील चांगले राहते. निरोगी आवाज एकंदरीत आरोग्य चांगले असल्याचे दर्शवतो, यामध्ये शारीरिक, भावनिक आणि मानसिक अशा सर्व घटकांचा समावेश होतो. आवाजाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शरीरात पाण्याची पातळी पुरेशी राखणे, नियमितपणे व्यायाम करणे, पोषक आहार घेणे आणि धूम्रपान, मद्यपान न करणे महत्त्वाचे आहे. योग किंवा श्वसनाचे व्यायाम केल्याने देखील तुमचा आवाज निरोगी राहण्यात मदत होते. आवाजाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी सर्वात चांगल्या सवयी कोणत्या त्याची माहिती करवून घेणे आवश्यक आहे. 

आवाजाचे आरोग्य चांगले राखण्यात आणि आवाजाशी संबंधित काही विकार होऊ नयेत यासाठी योग्य त्या माहितीसह जागरूकता असणे खूप महत्त्वाचे आहे. आवाजाशी संबंधित योग्य सवयींबाबत जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. लॅरिंगोलॉजिस्ट्स म्हणून आम्ही लोकांना आवाजाचा वापर करण्याबाबतच्या योग्य सवयींची माहिती देतो. त्यासाठी आवाजाची योग्य तंत्रे शिकवतो, आवाजाचे नुकसान होऊ शकेल अशा गोष्टींची माहिती देतो आणि चुकीची तंत्रे टाळून योग्य तंत्रे वापरायला शिकवून त्यांना सक्षम बनवतो.

आम्ही शाळा व समुदायांमध्ये शिक्षण कार्यक्रम राबवतो आणि आवाजाचे आरोग्य व जागरूकतेच्या सवयी शिकवतो. प्रत्येक व्यक्तीने स्वतः पुढाकार घेऊन लॅरिंगोलॉजिस्ट्ससोबत सहयोग केला पाहिजे व लोकांना आवाजाच्या आरोग्याविषयी माहिती दिली पाहिजे. आवाजाशी संबंधित समस्या उद्भवल्यास वैद्यकीय मदत घेण्याचे महत्त्व देखील लोकांना समजले पाहिजे आणि तशीच गरज उदभवली तर फुलटाइम स्पेशालिस्ट सिस्टीम असणाऱ्या रुग्णालयातील तज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. 

स्वर आरोग्य चांगले राखण्यासाठी टिप्स 

•    भरपूर पाणी प्या, दिवसातून किमान ६ ते ८ ग्लास पाणी प्यायले गेले पाहिजे. 

•    शरीर आतून आणि बाहेरून योग्य प्रमाणात आर्द्र राखले गेले पाहिजे. 

•    सकस आहार घ्या.

•    सतत घसा साफ करण्यापेक्षा पाणी पिणे, गिळणे किंवा आवाज न करता खोकला असे उपाय करा.

•    दिवसभरात बराच काळ आवाजाला विश्रांती द्या, विशेषत: आजारी असताना किंवा थकल्यावर काहीही बोलू नका. 

•    गोंगाटाच्या वातावरणात लक्ष वेधण्यासाठी शिट्ट्या, टाळ्या, हॉर्न किंवा घंटा वाजवा.

•    पोश्चर योग्य ठेवा.

•    तुमचे वरचे आणि खालचे दात एकमेकांना चिटकवून ठेवू नका, जेणेकरुन तुम्ही बोलता तेव्हा जबडा मोकळेपणाने हालचाल करत राहील.

•    मानेवर ताण राहू देऊ नका, त्यासाठी डोके हळुवारपणे पुढे आणि दोन्ही बाजूंना नेत हळुवारपणे हलवा. 

•    श्वासामध्ये नैसर्गिकरित्या होणारे बदल होऊ द्या.

•    ओटीपोटातून श्वासोच्छवास करा, सावध रहा आणि श्वास घेताना, सोडताना खालच्या  ओटीपोटाचा, मागे आणि बाजूंना नैसर्गिक विस्तार/रिलीज होऊ द्या.

•    तुमच्या नैसर्गिक पट्टीत हळूवारपणे बोला, आवाजाची पट्टी तुमच्यासाठी आरामदायी राहील याची काळजी घ्या. 

•    हळू बोला, जेव्हा जेव्हा श्वास घेणे आवश्यक असेल तेव्हा बोलण्यात विराम घ्या.  
•    जेव्हा पट्टी वाढेल आणि घसरेल तेव्हा रजिस्टर्स बदलू द्या, रजिस्टर बदल सहजपणे करता यावेत यासाठी गायन शिक्षकाचा सल्ला घ्या. 

•    बोलण्यापूर्वी, भाषण देण्यापूर्वी किंवा गायनाच्या आधी व्होकल वॉर्म-अप करा. 

•    आवाज पुन्हा आरामशीर स्थितीत आणण्यासाठी स्वराचा व्यायाम करा.

•    योग्य श्वासोच्छवास करत आवाज कसा निघेल ते शिकून घ्या. पोश्चर. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांच्याकडे तोंड करून बोला. तुम्हाला फार मोठ्याने किंवा ओरडून बोलावे लागू नये यासाठी सार्वजनिक जागी बोलण्यासाठी मायक्रोफोन वापरा. 

•    भावनांचा तुमच्यावर काय परिणाम होतो, याची जाणीव ठेवा, खासकरून जर त्यामुळे तुमची मान, घसा, जबडा किंवा छातीत स्नायूंचा ताण येत असेल तर जागरूक राहा. 

•    स्वराच्या थकव्याची पहिली चिन्हे ओळखायला शिका (आवाज कर्कश होणे, घसा कोरडा पडणे,  आवाजात तणाव येणे)

•    घशामध्ये ३-४ दिवसांपेक्षा जास्त काळ अस्वस्थता किंवा कर्कशपणा जाणवत असेल तर  डॉक्टरांचा सल्ला घ्या.

•    ऍलर्जी आणि संक्रमणांवर त्वरित उपचार करा.

•    कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याविना स्वतः घेणे टाळा.

Web Title: How to take care of voice and throat? Remedy told by doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.