तुमच्या नाभीची योग्य स्वच्छता करा, अन्यथा गंभीर आजार मागे लागतील; जाणून घ्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 03:50 PM2022-02-07T15:50:59+5:302022-02-07T15:54:46+5:30
तुम्ही तुमची बेली बटण म्हणजेच नाभी धुतली नाही तर काय होईल? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बेंबी नीट साफ न केल्यामुळं तुम्हाला आरोग्याच्या विविध समस्यांनाही (Health problems) सामोरं जावं लागू शकतं.
अनेकांचा बराच वेळ आंघोळीमध्ये जातो. तर काहीजण फक्त केली म्हणण्यापुरती अंघोळ करतात आणि लगेच बाहेर येतात. अंघोळ करताना बहुतेक लोक चेहऱ्याची, शरीराची त्वचा उजळण्यावर आणि दुर्गंधी दूर करण्यावर भर देतात. परंतु, तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही तुमची बेली बटण म्हणजेच नाभी धुतली नाही तर काय होईल? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बेंबी नीट साफ न केल्यामुळं तुम्हाला आरोग्याच्या विविध समस्यांनाही (Health problems) सामोरं जावं लागू शकतं.
खरंतर, एका डॉक्टरने टिकटॉकवर आपल्या फॉलोअर्ससोबत ही माहिती शेअर केली आहे. बेंबी रोज साफ न केल्यास काय होऊ शकते हे त्यांनी एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे. त्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर करण राज (Dr. Karan Raj) यांनी टिकटॉक या सोशल मीडिया अॅपवर एका व्हिडिओद्वारे नाभी साफ करण्याबाबत माहिती शेअर केली आहे. (Belly Button Cleaning Importance and Method)
डॉक्टरांनी काय सांगितले?
पेशाने एनएचएस (NHS Surgeon) सर्जन डॉ. राज यांनी सांगितले की, जर आपण नाभी नीट स्वच्छ केली नाही, तर तेथे साचलेली घाण हळूहळू दगडासारखी कठीण होऊ शकते. डॉ. राज यांनी याला 'ग्रिम ज्वेल्स' असं नाव दिलं आहे, ज्याला 'अबोमिनेबल ज्वेल’ (Abominable jewel)देखील म्हटलं जाऊ शकतं. NHS सर्जन डॉ. करण राज दररोज बेली बटण स्वच्छ करण्याची शिफारस करतात.
स्टोन कसा होतो
तज्ज्ञ म्हणाले, "घाम, त्वचेच्या मृत पेशी, तेल, कपड्यांचे फॅब्रिक, जंतू इत्यादी आपल्या शरीरावर जमा होऊ शकतात." त्यांनी व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं की, जेव्हा बराच वेळ घाण काढली जात नाही, तेव्हा ती त्या भागावर जमा होऊ लागते आणि साचत जाते. त्याला नाभी स्टोन म्हणून ओळखलं जातं.
त्यांनी पुढे सांगितले की, हे स्टोन अनेक रंगांचे असू शकतात. त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे ब्लॅक स्टोन, परंतु काही प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की ते तपकिरी देखील आहेत. त्याला वैद्यकीय परिभाषेत ओम्फॅलोइथ्स म्हणतात. या स्टोनमध्ये सेबम आणि केराटिन दोन्ही असतात. तुमच्या नाभीमध्ये मृत त्वचेसह इतर प्रकारची घाण साचू नये म्हणून सौम्य साबण आणि कोमट पाण्याने स्वच्छ ठेवा. नाभीच्या आतील आणि बाहेरील बाजू ओल्या कपड्याने स्वच्छ करा, नंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि रुमालाने थापून वाळवा.