खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्त्याची पाने केसगळती रोखण्याचा रामबाण उपाय, एकदा करून बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:00 AM2024-07-30T11:00:56+5:302024-07-30T11:05:32+5:30
आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. जो तुम्ही घरीच करू शकता आणि केसगळतीची समस्या थांबवू शकता.
Hair Care: केस गळतीची समस्या आजकाल मोठ्यांसोबतच कमी वयातील लोकांनाही होत आहे. ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. महिला आणि पुरूष दोघांनाही ही समस्या होते. अशात लोक केसगळती थांबवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण काहींना याचा फायदा मिळतो तर काहींना नाही. अशात आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. जो तुम्ही घरीच करू शकता आणि केसगळतीची समस्या थांबवू शकता.
वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा कढीपत्ता तुमची ही समस्या दूर करण्यास मदत करू शकतो. कढीपत्त्यांमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. तसेच यात अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिज असतात. पण अनेकांना कढीपत्ते केसगळती थांबवण्यासाठी कसे वापरावे हेच माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
केसांसाठी फायदेशीर कढीपत्ते
खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ता
खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्ता याचं मिश्रण पांढरे केस काळे करण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. जर तुमचेही केस कमी वयात पांढरे झाले असतील तर तुम्हीही हे घरगुती उपाय ट्राय करू शकता. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ताही वापरू शकता. यासाठी एका वाटीमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल गरम करा. त्यात कढीपत्ता टाका. थोड्या वेळाने हे तेल डोक्याच्या त्वचेवर लावा. काही महिन्यात तुमचे केस पुन्हा काळे होतील.
कढीपत्याची पाने केसांवर लावण्याचे अनेक फायदे असतात. याने केस चमकदार होतात. केसांना तोंड फुटण्याची समस्याही याने दूर होते. इतकंच नाही तर डोक्याच्या त्वचेवर इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं आणि डॅमेज झालेले केस रिपेअर होतात. केस पांढरे होण्याची समस्याही दूर होते.
कढीपत्त्याची पाने केसांवर वेगवेगळ्या पद्धतीने लावली जाऊ शकतात.
कढीपत्त्याची पाने बारीक करून दह्यात मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आठवड्यातून एकदा केसांवर लावा. याने केसातील कोंड्याची समस्या दूर होईल. जी केसगळतीचं एक मुख्य कारण आहे.
खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचा रस
अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि केमिकलच्या वापरामुळे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे ते लगेच ठीक केले जाऊ शकत नाहीत. पांढरे केस काळे करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करा आणि केसांच्या मुळात लावा. केसांच्या मुळात या तेलाने चांगली मालिश करा. लिंबाच्या रसात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे ऑक्सिडेटिव स्ट्रेस दूर करण्यास मदत करतात. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा वापरा.
हे मिश्रण तयार करण्यासाठी एका वाटीत खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. साधारण 1 तासानंतर हे तेल केसांच्या मुळात लावा, चांगली मालिश करा. काही दिवस ही क्रिया केल्यावर लवकरच पांढरे केस काळे होऊ लागतील.