त्वचेवरील पुरळ आणि सुरकुत्या दूर करायच्यात? तुरटीचा असा करा वापर, मग बघा कमाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:36 AM2024-08-12T11:36:22+5:302024-08-12T11:36:51+5:30
How to Use Alum for Skin :तुरटीच्या वापराने त्वचेवरील सुरकुत्याही दूर करण्यास मदत मिळते. अशात चला जाणून घेऊ तुरटीचा वापर कसा करावा.
How to Use Alum for Skin : वातावरणात बदल झाल्याने, आहारात बदल झाल्याने किंवा चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अनेकदा पिंपल्स दूर होतात पण त्यांचे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात. हे डाग दूर करणं काही सोपं काम नाही. यावर अनेक उपाय करूनही यापासून सुटका मिळत नाही. असात आज आम्ही तुम्हाला हे डाग दूर करण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहोत. तुरटीचा वापर करून तुम्ही हे डाग दूर करू शकता. तुरटीच्या वापराने त्वचेवरील सुरकुत्याही दूर करण्यास मदत मिळते. अशात चला जाणून घेऊ तुरटीचा वापर कसा करावा.
कसा करावा तुरटीचा वापर?
एक कप पाण्यात एक मोठा चमचा तुरटीचं पावडर टाका. तसेच यात काही तुळशीची पाने आणि ग्लिसरीनचे चार ते पाच थेंब टाका.
आधी पाणी उकडून घ्या आणि त्यात तुळशीची पाने टाका आणि नंतर तुरटीचं पावडर टाका. याचं चांगलं मिश्रम झाल्यावर गॅस बंद करा. हे मिश्रण थंड होऊ द्या. नंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि त्यात काही थेंड ग्लिसरीन टाका. हे मिश्रण एका दिवसासाठी फ्रिजमध्ये ठेवा. हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर स्प्रे करा आणि ते तसंच सुकू द्या. रोज एक ते दोन वेळा हा उपाय करा.
तुरटीचे फायदे
- तुरटी चेहऱ्यावर लावल्याने तुमचे सुजलेले डोळे बरे होऊ शकतात आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊ शकतात.
- तुरटीमध्ये त्वचेचा सैलपणा कमी होतो आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते.
- तसेच यात काही असे तत्व असतात जे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करतात. या तेलामुळे त्वचेवर पिंपल्स येतात.
- ग्लिसरीन यात मिक्स केल्याने त्वच चांगली आणि स्वच्छ राहते. त्वचेवर इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो.