मिठात 'ही' एक गोष्ट मिक्स करून दातांवर लावाल तर दूर होईल कीड आणि असह्य दुखणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 11:04 AM2024-10-11T11:04:07+5:302024-10-11T11:04:35+5:30
Tooth Cavity Home Remedies : तुम्ही दातांच्या कीडण्यामुळे किंवा कॅव्हिटीमुळे हैराण असाल तर एक घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे दात चांगले राहतील आणि तुम्हाला आरामही मिळेल.
Tooth Cavity Home Remedies : दातांची योग्यपणे काळजी घेतली नाही तर दातांना कीड लागते आणि दात कमजोर होतात. तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने दातांसंबंधी अनेक समस्यांचा धोका वाढतो. जसे की, दातांमध्ये कीड लागणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दात पिवळे होणे आणि तोंडाची दुर्गंधी येणे. अशात तुम्ही दातांच्या कीडण्यामुळे किंवा कॅव्हिटीमुळे हैराण असाल तर एक घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे दात चांगले राहतील आणि तुम्हाला आरामही मिळेल.
दातांची कीड घालवण्याचे घरगुती उपाय
लसूण
दातांची कीड कमी करण्यासाठी आणि यामुळे होणारी वेदना दूर करण्यासाठी तुम्ही लसणाचा वापर करू शकता. दातांच्या कीडीवर लसणामधील अॅंटी-बायोटिक आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण प्रभावी ठरतात. याने दातांमधील इन्फेक्शन कमी होतं. यासाठी लसूण बारीक करून यात थोडं मीठ टाका. हे मिश्रण कीड लागलेल्या दातावर काही वेळ लावून ठेवा. नंतर पाण्याने गुरळा करा.
लवंग तेल
लवंग ही वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी मानली जाते. दातांची दुखणं दूर करण्यासाठी याचा भरपूर वापर केला जातो. एनेस्थेटिक आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुणांमुळे लवंगाचं तेल दातांना आराम देतं. याने मांसपेशी काही वेळासाठी सुन्नही होतात. ज्यामुळे दातांमध्ये होणारी वेदना कमी होते.
मिठाचं पाणी
नॅचरल अॅंटी-सेप्टिकसारखा मिठाच्या पाण्याचा वापरही केला जाऊ शकतो. मिठाच्या पाण्याने दातांच्या कीडीमुळे होणारी वेदना कमी करतं. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ टाका. या पाण्याने काही वेळ गुरळा करा. याने दातही स्वच्छ होतील आणि कीड कमी होण्यासही मदत मिळेल.
हळद पेस्ट
दातांची कीड दूर करण्यासाठी हळदीची पेस्टही खूप फायदेशीर ठरते. हळदीची पेस्ट तयार करण्यासाठी थोडी हळद घ्या, त्यात थोडं पाणी किंवा मोहरीचं तेल मिक्स करून पेस्ट तयार करा. या पेस्टने दातांची सफाई तर होईलच, सोबतच दातांचं दुखणंही दूर होईल. इतकंच नाही तर दातांना लागलेली कीडही दूर होईल.