पांढरे झालेले केस काळे करण्याचा बेस्ट उपाय, मोहरीच्या तेलाचा असा करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 03:33 PM2024-04-23T15:33:22+5:302024-04-23T15:47:41+5:30
मोहरीचं तेल आणि मेथीचा वापर करून तुम्ही केस काळे करू शकता.
Mustard Oil And Fenugreek Seeds : आजकाल चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किंवा चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे कमी वयातच लोकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. अशात लोक वेगवेगळे उपाय करतात. पण फायदा होतोच असं नाही. आज आम्ही तुम्हाला पांढरे झालेले केस काळे करण्याचा एक घरगुती उपाय सांगणार आहोत. मोहरीचं तेल आणि मेथीचा वापर करून तुम्ही केस काळे करू शकता. मोहरीचं तेल आणि मेथीच्या दाण्यांमधील व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि अॅंटी-ऑक्सिडेंट केसांना पोषण देतात आणि केसा नॅच्युरली काळे होतात.
कसं लावाल तेल?
मोहरीचं तेल गरम करा. यानंतर यात मेथीच्या दाण्यांचं पावडर मिक्स करा. पावडरचा रंग डार्क होईपर्यंत दोन्ही गरम करा. हे तेल कोमट करून केसांच्या मुळात लावा. 5 ते 6 तास हे तेल केसांना लावून ठेवा आणि मग केस धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. काही दिवसांनंतर तुम्हाला फरक दिसेल. तुमचे केस काळे होतील. तसेच केसगळतीही दूर होईल.
मेथीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. यात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं. तसेच मोहरीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. जे केसांना काळे करतात आणि केस मजबूत करतात.
मोहरी आणि मेथीचे फायदे
मोहरीचं तेल लावल्याने केस सुंदर होतात. जुन्या काळात लोक केसांना मोहरीचं शुद्ध तेल लावत होत्या. यामुळेच केसांचं आयुष्यही वाढत होतं आणि केस दाट, काळे व लांब होत होते. मोहरीच्या तेलामध्ये जर मेथीचे दाणे मिक्स करून लावलं तर दुप्पट फायदा मिळतो. हे तेल लावल्याने केस नॅच्युरल पद्धतीने काळे होतात.