चेहरा चमकदार करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा कसा कराल वापर? जाणून घ्या पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:59 AM2024-08-16T10:59:51+5:302024-08-16T11:00:22+5:30

Potato Peels Use : तुम्ही बटाट्याच्या सालीचा योग्यपणे वापर केला तर ते तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या सालीचा त्वचेसाठी कसा वापर करावा हे सांगणार आहोत.

How to use potato peels to bring glow on your face | चेहरा चमकदार करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा कसा कराल वापर? जाणून घ्या पद्धत...

चेहरा चमकदार करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा कसा कराल वापर? जाणून घ्या पद्धत...

How To Use Potato Peel For Face: सामान्यपणे जास्तीत जास्त लोक बटाट्याची साल फेकून देतात. कारण अनेकांना याचे फायदे माहीत नसतात. बटाट्याच्या सालीने त्वचेसाठी खूप फायदे असतात. यात भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जर तुम्ही बटाट्याच्या सालीचा योग्यपणे वापर केला तर ते तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या सालीचा त्वचेसाठी कसा वापर करावा हे सांगणार आहोत.

चेहरा चमकदार करण्यासाठी बटाट्याची साल

१) बटाट्याची साल आणि मध

मध हे एक नॅचरल मॉइश्चरायजर आहे. जे त्वचेला मुलायमपणा देतं. बटाट्याची साल बारीक करून ते मधात मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. याने त्वचा उजळेल आणि चमकदार दिसेल. तसेच त्वचेवरील डागही कमी होतील.

२) बटाट्याची साल आणि दही

दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असतं. जे त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यास मदत करतं. बटाट्याची सालीची पेस्ट दह्यात मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे हे असंच ठेवा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. याने त्वचा चमकदार होईल.

३) बटाट्याची साल आणि हळद

हळदीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. बटाट्याची सालीची पेस्ट हळदीमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या. त्वचेवर उजळपणा दिसेल.

४) बटाट्याची साल आणि गुलाबजल

गुलाबजल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. अशात गुलाबजल आणि बटाट्याची साल मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास अधिक फायदा मिळतो. याने त्वचा उजळते आणि त्वचेला थंडावाही मिळतो.

५) बटाट्याची साल आणि लिंबाचा रस

लिंबाचा रस त्वचेला ब्लीच करण्यास मदत करतो आणि यामुळे त्वचा उजळते. बटाट्याच्या सालीची पेस्ट बनवा आणि त्यात थोडा लिंबाचा रस टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. याने त्वचेचा टोन सुधारेल आणि काळे डागही दूर होतील.

Web Title: How to use potato peels to bring glow on your face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.