वजन लवकर कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचं कसंं कराल सेवन? जाणून घ्या योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 11:12 AM2024-09-27T11:12:02+5:302024-09-27T11:12:47+5:30

Weight Loss Tips : एक बेस्ट उपाय म्हणजे मेथीच्या दाण्यांचं पाणी. मेथीच्या दाण्यांनी वजन तर कमी होतंच, सोबतच आरोग्याला अनेक फायदेही मिळतात.

How to use soaked methi seeds for weight loss | वजन लवकर कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचं कसंं कराल सेवन? जाणून घ्या योग्य पद्धत...

वजन लवकर कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचं कसंं कराल सेवन? जाणून घ्या योग्य पद्धत...

Weight Loss Tips : आजकालच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किंवा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. कमी वयातच वजन वाढणं ही एक गंभीर समस्या जास्तीत जास्त लोकांमध्ये बघायला मिळते. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी असे अनेक घरगुती उपाय आहे जे लोकांना माहीत नसतात. त्यातील एक बेस्ट उपाय म्हणजे मेथीच्या दाण्यांचं पाणी. मेथीच्या दाण्यांनी वजन तर कमी होतंच, सोबतच आरोग्याला अनेक फायदेही मिळतात.

न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांनी सांगितलं की, मेथीच्या बियांच्या मदतीने वजन कमी कसं करावं आणि वजन कमी करण्यासाठी याचं किती सेवन करावं?

मेथीच्या बियांनी कमी होतं वजन

मेथीच्या बियांमध्ये फायबर, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. फायबर वजन कमी करण्यासाठी फार फायदेशीर असतं. फायबरमुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा होते. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

बद्धकोष्ठता होईल दूर

बद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथी 2 ग्लास पाण्यात टाकून पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत पाणी उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट याचं सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल.

पचनक्रिया सुधारतात मेथीच्या बीया

मेथीच्या बियांमुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे तुम्हाला कॅलरी अधिक बर्न करण्यास मदत मिळते. त्याशिवाय मेथीच्या बियांमुळे कार्बोहायड्रेटचं अवशोषण हळू करून ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होतं. यामुळे गोड खाण्याची ईच्छा कमी होते आणि भूकही कंट्रोल होते.

कोलेस्ट्रॉल होतं कमी

मेथीच्या बीयांचं या रूपात केल्या गेलेल्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हलही संतुलित करण्यास, किडनीसंबंधी समस्या दूर करण्यास, डायबिटीसची समस्या दूर करण्यास, हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास आणि केसांची काळजी घेण्यासाठी फायदा होतो. 

कसं कराल मेथीच्या बियांचं सेवन?

एक्सपर्टनुसार, १ ते २ चमचे मेथी एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे चावून खावेत आणि वरून पाणी प्यावे. हा उपाय नियमितपणे केल्यास तुम्हाला लवकरच फायदा दिसून येईल. 

Web Title: How to use soaked methi seeds for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.