वजन कमी करण्यासाठी जिरे असे आहे फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 03:46 PM2018-04-16T15:46:33+5:302018-04-16T15:46:33+5:30
जिरे हा एक मसाल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो. जिरे केवळ खाण्यासाठी मर्यादीत नाही तर आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
मुंबई : वजन कमी करण्याची समस्या आहे. जर तुम्ही रोज एक चमचा जिरे खाल्ले तर ही समस्या लवकच दूर होईल. तसेच जिरे खाल्ल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
जिरे हा एक मसाल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो. जिरे केवळ खाण्यासाठी मर्यादीत नाही तर आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचा उपयोग औषध म्हणून केला जात आहे.
जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शियम, फायबर, झिंक आदींची जास्त मात्रा असते. मेक्सिको, भारत, नार्थ अमेरिका या देशांत जिऱ्याचा जास्त वापर केला जातो.
जिरे देखील वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अलीकडील अभ्यासात जिरेपूड नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यात मदत करते. शिवाय जिरेपूड, शरीरातील चरबी कमी करते. एक चमचा जिरे ग्लासभर पाण्यात पाणी रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी उकळवून चहा म्हणून त्याचा उपयोग करा. तर उर्वरित जिऱ्याचे चर्वण करा.
शरीरातील अनावश्यक चरबी बाहेर काढण्यास जिरे मदत करते. तसेच जिरेपूड खल्ल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका. भाजलेले हिंग, जिरे, काळे मिठ आणि पावडर १-३ ग्रॅम समान प्रमाणात करा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा दह्यासोबत घ्या. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. जिरे शरीरातील रक्ताभिसरण चांगले करते शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करते.
कसा कराल वापर?
500 मिली पाण्यात अद्रक, एक चमचा जिरे किंवा जी-याची पूड मिश्रीत करा. याला चांगल्याप्रकारे उकळून घ्या. याचा स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही त्यात दालचीनी आणि वेलची टाकू शकता. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात लिंबू टाकून त्याचे सेवन करा.