किडनी स्टोनसाठी ऑपरेशन कशाला? कुळीदाच्या पाण्याचं सेवन करून समस्या होईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 05:38 PM2020-03-20T17:38:11+5:302020-03-20T17:48:44+5:30
किडनी स्टोनची समस्या निर्माण झाल्यास ऑपरेशन करावं लागू नये यासाठी उपाय सांगणार आहोत.
आरोग्याच्या समस्या आपण कितीही जरी काळजी घेतली तरी उद्भवत असतात. किडनीस्टोनची समस्या निर्माण होणं ही सामान्य गोष्ट आहे. या आजारात व्यक्तीला पोटात खूप वेदना होतात. किडनीस्टोन झाल्यानंतर स्टोन बाहेर निघेपर्यंत रुग्णाला खूप त्रास होतो. अनेकदा ऑपरेशन सुद्धा करावं लागतं. आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोनची समस्या निर्माण झाल्यास ऑपरेशन करावं लागू नये यासाठी उपाय सांगणार आहोत. या उपायाचा वापर करून किडनी स्टोन झालेला व्यक्ती खर्च न करता बरा होऊ शकतो.
कुळीद या कडधान्याचा वापर भारतात मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेकजण रोजच्या आहारात कुळीदाच्या डाळीचा समावेश करत नसतील पण त्यांनी कुळीदाच्या डाळीबद्दल नक्की ऐकलं असेल. सहज उपलब्ध होणारी ही डाळ आहे. या दाळीच्या सेवनाने किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.
यात असलेले पोषक घटक किडनी स्टोन काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. यात फेनोलिक कंपोनेंट, फ्लेवोनोइड्स, स्टेरॉयड आणि सॅपोनिन असतं. या डाळीचा वापर करण्यासाठी स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घ्या. ( हे पण वाचा-Corona virus : गोळ्या,औषधं नाही तर 'ही' योगासनं करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा....)
त्यासाठी २०० मिली पाण्यात २५ ग्राम दाळ घालून उकळून घ्या. पाणी आटल्यामुळे अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या. सतत १ ते २ महिने हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. तुम्ही नियमितपणे हा प्रयोग करू शकता कारण याचे कोणतेही साईडइफेक्टस नाहीत. ( हे पण वाचा-इन्फेक्शन आणि आजारांचं टेंशन नकोय? तर साखरेऐवजी गुळाचं सेवन ठरेल इफेक्टिव्ह)