डेंग्यूच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतात पपईची पानं; असा करता येईल वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 12:03 PM2018-09-15T12:03:30+5:302018-09-15T12:03:46+5:30
सध्या पावसाने दडी मारली असली तरीदेखील अनेक आजारांनी आपली डोकी वर काढली आहेत. सगळीकडे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
सध्या पावसाने दडी मारली असली तरीदेखील अनेक आजारांनी आपली डोकी वर काढली आहेत. सगळीकडे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून डॉक्टरांच्या औषधांसोबतच काही घरगुती उपाय करणं देखील फायदेशीर ठरतं. फळं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात हे आपण सारेच जाणतो, पण त्यातल्या त्यात पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पपईप्रमाणेच पपईची पानंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अनेक आजरांवर पपईच्या पानांचा रस फायदेशीर असतो. डेंग्यू, मलेरिया याशिवाय पपईच्या पानांचा रस हार्ट अटॅक, डायबेटीज, डेंग्यू आणि कॅन्सर यांसारख्या आजारांपासून शरीराचं रक्षण करतो. संशोधनानुसार, पपईच्या पानांमध्ये डेग्यूंचा प्रभाव कमी करण्याची क्षमता असते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करून शरीराचा इन्फेक्शनपासून बचाव करण्यासह मदत होते. जाणून घेऊयात पपईच्या पानांचे आरोग्यदायी फायदे...
1. प्लेटलेट काउंट वाढविण्यासाठी
अनेक संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, पपईच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरातील प्लेटलेट्स आणि आरबीसी काउंट वाढतो. त्याचप्रमाणे ब्लड सर्क्युलेशनही वाढतं. यामुळे डेंग्यू झालेल्या रूग्णांना पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही देण्यात येतो.
2. कॅन्सरपासून बचाव
पपईच्या पानांच्या रसामध्ये अॅन्टी-ट्यूमर गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. जे कॅन्सरचे काही प्रकार, विविध प्रकारच्या अॅलर्जी यांसारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
3. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी
संशोधनानुसार, पपईच्या पानांच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात. याचा ज्यूस प्यायल्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि किडनी, लिव्हर आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.
4. बद्धकोष्ठता आणि मूळव्याधावर परिणामकारक
पपईला लॅक्सेटिव्ह म्हणून ओळखले जाते. जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. याच्या पानांचा रस प्यायल्याने पोटाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.