'शाकाहारी' विराटच्या प्लेटमध्ये 'चिकन टीक्का'; चाहते संभ्रमात, पण खरा ट्विस्ट बातमी वाचून कळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:59 AM2023-12-13T11:59:37+5:302023-12-13T12:00:44+5:30

What is Mock Meat : विराट कोहली हा व्हेजिटेरिअन झाला हे काही महिन्यांआधी समोर आलं होतं. पण त्याच्या एका फोटोमुळे तो पुन्हा नॉन-व्हेजिटेरिअन झाला की काय? असं लोकांना वाटू लागलं आहे. 

How vegetarian Virat Kohli eats Mock meat? Know what is Mock meat and how it make | 'शाकाहारी' विराटच्या प्लेटमध्ये 'चिकन टीक्का'; चाहते संभ्रमात, पण खरा ट्विस्ट बातमी वाचून कळेल

'शाकाहारी' विराटच्या प्लेटमध्ये 'चिकन टीक्का'; चाहते संभ्रमात, पण खरा ट्विस्ट बातमी वाचून कळेल

What is Mock Meat : भारतीय क्रिकेट टिमचा दमदार खेळाडू विराट कोहली सध्या आराम करतो आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियासोबत सुरू असलेल्या टी-20 सीरीजमध्ये दिसत नाहीये. वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर तो आराम करतोय. विराट नेहमीच त्याची फीटनेस आणि लाइफस्टाईलमुळेही चर्चेत असतो. विराट कोहली हा व्हेजिटेरिअन झाला हे काही महिन्यांआधी समोर आलं होतं. पण त्याच्या एका फोटोमुळे तो पुन्हा नॉन-व्हेजिटेरिअन झाला की काय? असं लोकांना वाटू लागलं आहे. 

त्याने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात एक डिश दिसत आहे. त्यात तो 'चिकट टिक्का' खात असल्याचं दिसत आहे. जे बघून त्याचे फॅन्स हैराण झाले आणि विराट पुन्हा नॉन-व्हेजिटेरिअन झाला की, काय? असा प्रश्न त्याना पडला. पण यामागचं सत्य काही वेगळंच आहे. विराटच्या डिशमध्ये 'मॉक मीट' होतं. जे व्हेजिटेरिअन लोकही खाऊ शकतात. चला तर जाऊन घेऊ काय आहे हे मॉक मीट.
नुकतीच विराट कोहली याने व्हेजिटेरिअन डाएट आणि विगन डाएट सुरू केली. सोबतच विराटच्या डाएटमध्ये मॉक मीट आहे. पण हे मीट व्हेजिटेरिअन म्हणजे शाकाहारी लोकही खाऊ शकतात. 

काय आहे मॉक मीट?

विराटच्या डाएटमध्ये मॉक मीटचाही समावेश आहे. ज्याला सामान्य भाषेत नकली मांस किंवा शाकाहारी लोकांचं मीट असं म्हटलं जातं. मॉक मीटमध्ये अशा गोष्टी टाकल्या जातात ज्या दिसण्यासोबतच टेस्टलाही नॉन-व्हेजसारख्याच दिसतात. सोबतच यात तेवढंच पोषण असतं जेवढं नॉन-व्हेजमध्ये असतं. 

कशापासून तयार होतं?

मॉक मीटच्या लिस्टमध्ये फणस, सोया, वीट प्रोटीन ग्लूटन, मशरूम किंवा काही प्रकारच्या डाळींचा समावेश असतो. जे तुम्ही सॉसेज, चाप, नगेट किंवा डिमसम्सच्या रूपात खाऊ शकता. मॉक मीट मासांहाराला चांगला पर्याय आहे. चीनी रेस्टॉरंटमध्ये मॉक मीटसाठी सोयाबीनच्या पनीरचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. 

विराट कोहलीच्या वर्ल्ड कप डाएटमध्ये व्हेज डिमसम, सोया, मॉक मीट, लीन प्रोटीन, तोफू आणि कडधान्या तसेच इडली, डोसा यांचा समावेश होता. 

Web Title: How vegetarian Virat Kohli eats Mock meat? Know what is Mock meat and how it make

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.