चालण्याने वजन कमी कसं होतं? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 01:30 PM2019-09-07T13:30:07+5:302019-09-07T13:40:46+5:30

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या कठिण एक्सरसाइज, डायटिंग आणि योगा करतात. या कठिण उपायांच्या नादात आणि वजन कमी करण्याच्या टेंशनमध्ये अनेकजण सोपे उपायही विसरून जातात.

How walking can help you to lose weight? | चालण्याने वजन कमी कसं होतं? जाणून घ्या कारण...

चालण्याने वजन कमी कसं होतं? जाणून घ्या कारण...

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या कठिण एक्सरसाइज, डायटिंग आणि योगा करतात. या कठिण उपायांच्या नादात आणि वजन कमी करण्याच्या टेंशनमध्ये अनेकजण सोपे उपायही विसरून जातात. काही असेही उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, चालण्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. आणि हा सर्वात सोपा उपाय आहे. कारण याच्या मदतीने तुम्ही जास्त कॅलरी बर्न करू शकता.

चालण्यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जेणेकरून लवकर आणि सहजपणे वजन कमी होऊ शकेल. चालल्याने केवळ वजनच कमी होत नाही तर तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जाही मिळते. सोबतच वेगवेगळ्या आजारांपासूनही सुटका मिळते. चला जाणून घेऊ चालण्याने वजन कसं कमी होतं.

१) रोज किती चालावं? 

(Image Credit : ohsunnymornings.com)

तुम्ही किती पावलं चाललात हे तुम्ही एखाद्या अ‍ॅपच्या मदतीने ट्रॅक करू शकता. सुरूवातीला १५ हजार पावलं चालणं थोडं कठिण आहे. पण एकदा सवय झाली तर सोपं होतं. चालल्याने मांसपेशींमध्ये होणारी वेदनाही दूर होते. १५ हजार पावलं चालणं हा वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे. ४५ मिनिटांच्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही ४०० ते ५०० कॅलरी बर्न करू शकता. 

२) दिवसातून ३ वेळा २० मिनिटे चाला-

(Image Credit : couragelivingcare.com)

एकाचवेळी जास्त वेळ चालण्याऐवजी तुम्ही चालण्याची प्लॅन विभागू शकता. २०-२० मिनिटांचा कालावधी तीन भागात करा. जेवणानंतर १५-२० मिनिटे चालावे. याने ब्लड शुगर कंट्रोल करण्यासही मदत मिळते. एकदाच ४५ मिनिटे चालण्यापेक्षा तीन वेळा २० मिनिटे चालणे जास्त सोपं आणि फायदेशीर ठरेल.  

३) चालण्याआधी ग्रीन टी घ्या-

(Image Credit : punjabkesari.in)

मेटाबॉलिज्म बूस्ट झाल्यास वजन कमी करण्यासाठी जास्त मदत होते. ग्रीन टी मेटाबॉलिज्मला बूस्ट करते. योग्य प्रमाणात कॅफीन आणि कॅटिसचं मिश्रण फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वाढते. 

४) योग्य प्रमाणात पाणी -

(Image Credit : thesocialbutterfly.me)

योग्य प्रमाणात पाणी सेवन केल्याने वजन कमी होण्यास अधिक मदत मिळते. रोज १.५ लिटरपेक्षा अधिक पाण्याचं सेवन केल्याने तुम्ही १७ हजार ४०० कॅलरी एक वर्षात बर्न करू शकता.

५) एक्सरसाइज करताना ब्रेक

(Image Credit : soposted.com)

एकसारख्या गोष्टी करणं कुणालाच आवडणार नाही. याची शरीराला देखील सवय नसते. चालतना रोज तुमचा स्पीड की जास्त करत रहावा. रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बदल केल्यास २० टक्के अधिक कॅलरी बर्न केल्या जाऊ शकतात. सोबतच चालताना एका मिनिटाचा ब्रेक घ्या आणि पुन्हा चालायला लागा.

Web Title: How walking can help you to lose weight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.