ना एक्सरसाइज, ना डाएट; तरी 'तिनं' घटवलं 10 किलो वजन; जाणून घ्या कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:38 PM2019-09-11T15:38:23+5:302019-09-11T15:40:56+5:30
अनियमित जीवनशैली आणि चुकीचा आहार यांमुळे लठ्ठपणाचा प्रत्येकालाच सामना करावा लागत आहे. अशातच प्रत्येकालाच आपलं वजन कमी करायचं असतं पण वजन कमी करणं पाहायला गेलं तर सोपी गोष्ट नाही.
(फोटो सांकेतिक)
अनियमित जीवनशैली आणि चुकीचा आहार यांमुळे लठ्ठपणाचा प्रत्येकालाच सामना करावा लागत आहे. अशातच प्रत्येकालाच आपलं वजन कमी करायचं असतं पण वजन कमी करणं पाहायला गेलं तर सोपी गोष्ट नाही. एक्सरसाइज, जिम आणि डाएटिंग केल्यानंतरही अनेकांचं वजन जैसे थे वैसचं राहतं. पण एका महिलेने काही वेळातच आपलं वजन कमी केलं आहे. या महिलेचं वजन 102 किलो होतं.
आजारामुळे वाढलं होतं वजन
हायपोथायरॉइडज्मि, पीसीओडी, तणाव, गुडघ्यातून येणारा कट-कट आवाज, स्टॅमिन्याच्या कमतरतेमुळे मेघा नावाच्या महिलेचं वजन 102 किलोंनी वाढलं होतं. परंतु स्वतःला फिट ठेवण्यासाठीच्या प्रयत्नांनी तिने आपलं वजन कमी केलं आहे. तिने फक्त 9 महिन्यांमध्ये 10 किलो वजन कमी करून सर्वांना हैराण केलं आहे.
लेटर लिहून शेअर केली आपली कहाणी...
मेघा यांनी सांगितलं की, मला माहिती आहे की, दररोज तुमच्याकडे असे हजारो ई-मेल्स येत असतील. असं काही करण्याचा हा माझा पहिला प्रयत्न आहे. मी कोणीही सामाजिक व्यक्ती नाही. मी एक सामान्य महिला आहे. मी आयटी प्रोफेशनल असून कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमधून प्रवास करत असते. मागील 3 वर्षांमध्ये मी लंडनमध्ये राहत होती. या काळात माझं वजन वाढलं. मी शाकाहारी आहार घेते. माझं वजन एवढं वाढलं की, मला मेट्रोच्या पायऱ्या चढणंही अशक्य होत होतं. जेव्हा मी प्रयत्न करत असे तेव्हा माझ्या हाडांमधून कट-कट असा आवाज येत होता.
ऋजुता दिवेकर यांचे व्हिडीओ पाहून कमी केलं वजन
मेघा यांनी सांगितले की, 'मी यूट्यूबवर ऋजुता दिवेकर यांचा व्हिडीओ पाहिला. त्याआधी मी वेगवेगळ्या डॉक्टरांचा आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतला होता. तेव्हा मी विचार केला की, एकदा ऋजुता यांच्या टिप्स फॉलो करून पाहायला काय हरकत आहे. त्यांचा सल्ला लक्षात घेऊन मी आपल्या लाइफ स्टाइलमध्ये बदल केले. ज्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला.
वर्कआउटही ठरलं फायदेशीर
सुरुवातीचे 4 महिने मेघा यांना खुर्चीवर बसणंही अशक्य होत होतं. तरि त्यांनी वेगवेगळ्या दिवशी वर्कआउट केलं. सुरुवातीला त्यांना प्रचंड त्रास झाला. एवढचं नाहीतर त्यांना रात्री झोप लागत नव्हती, अंग प्रचंड दुखणं, शरीराचं तापमान असंतुलित होणं आणि मांसपेशींमध्ये वेदना होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागला. पण त्या थांबल्या नाहीत त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले.
झुंबा आणि स्विमिंग क्लास
वर्कआउट व्यतिरिक्त त्यांनी झुंबा आणि स्विमिंगचे क्लासेस घेतले. शरिराचा स्टॅमिना वाढविण्यासाठी त्यांनी गार्डनिंग करण्यास सुरुवात केली. आपल्या रूटिनमध्ये हे बदल केल्यानंतर त्यांनी 9 महिन्यांमध्ये चक्क 10 किलो वजन कमी केलं.
घरगुती आहार ठरला फायदेशीर
वर्कआउट केल्यानंतर त्यांनी बाहेरील खाणं पूर्णपणे बंद केलं आणि घरगुती आहारच घेण्यास सुरुवात केली. आपल्या डाएटमध्ये त्यांनी डाळ, तूप, फळं, भाज्या इत्यादिंचा समावेश केला. जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरलं.
सूर्य नमस्कार आणि वेट ट्रेनिंग
15 वेळा सूर्य नमस्कार करण्यासोबतच एक तासांची ट्रेनिंग आणि 8 ते 10 किलोमीटर चालणं त्यांचं रूटिन बनलं आहे. यामुळे त्यांना सतावणारी गुडघेदुखी 50 टक्क्यांनी कमी झाली आहे.
तणाव कमी करण्यासाठी करा ही काम
मेघा यांनी सांगितलं की, त्यांनी 50 झाडं लावली असून दररोज सकाळी अर्धा तास त्या त्यांच्यासोबत घालवतात. आता मला तणाव जाणवत नाही. माझं रूटिन बीझी आहे. पण तरिही मी माझ्या वर्कआउट आणि डाएटकडे दुर्लक्षं करत नाही.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)