VIDEO : घरबसल्या अशी करू शकता डिहायड्रेशन टेस्ट, जाणून घ्या शरीराला पाण्याची गरज आहे की नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 05:49 PM2021-07-05T17:49:23+5:302021-07-05T17:57:58+5:30
Health tips : करन राजने आपल्या इन्स्टाग्रामवर घरीच डिहायड्रेशन चेक करण्याबाबत सांगितलं. या टेस्टचं नाव आहे स्किन पिंच टेस्ट.
उन्हाळ्यात एक डायलॉग डोक्यात फिट करून घेतला पाहिजे की, 'पाणी पित रहावं मित्रा'. कारण समजतच नाही की, आपल्या शरीरातील पाणी कधी कमी होईल. आपल्याला डिहायड्रेशन होऊ लागते, तोंड कोरडं पडू लागतं आणि त्यानंतर तब्येत बिघडू लागते. अशात पाणी पिणे हाच एकमेव उपाय आहे. मात्र, घरी बॉ़डीचं डिहायड्रेश (dehydrated) कसं चेक करावं. चला आज आम्ही तुम्हाला हेच सांगतो.
डॉक्टर करन राजने आपल्या इन्स्टाग्रामवर घरीच डिहायड्रेशन चेक करण्याबाबत सांगितलं. या टेस्टचं नाव आहे स्किन पिंच टेस्ट. ही टेस्ट करून तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता की, तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे किंवा नाही. (हे पण वाचा : चिंता वाढली! इम्यूनिटी वाढवणाऱ्या 'या' उपायाने लिव्हर होत आहे डॅमेज, डॉक्टरांनी दिला इशारा)
ही टेस्ट करण्यासाठी तुम्हाला बोटाच्या मधल्या स्किनला पिंच करायचं आहे. स्किनला पुन्हा नॉर्मल व्हायला वेळ लागत असेल तर समजून घ्या की, तुम्हाला पाणी पिण्याची गरज आहे. म्हणजे तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे. तर स्किन पुन्हा लगेच नॉर्मल होत असेल तर तुमच्या शरीरात पुरेसं पाणी आहे.
या टेस्टला Skin Trugor Test असंही म्हटलं जातं. त्यामुळे उन्हाळ्यात किंवा गरमी होत असताना पाणी सतत चेक करत राहिलं पाहिजे. कारण शरीरात जर पाणी कमी झालं तर तुम्ही आजारी पडू शकता. तुम्ही कुठेही चक्कर येऊन पडू शकता.