मास्कच्या वापराबाबत 'या' गोष्टी माहीत असतील तरच होईल संक्रमणापासून बचाव; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 03:53 PM2020-07-21T15:53:17+5:302020-07-21T16:01:30+5:30

मास्कचे कापड वॉशेबल आणि मऊ मुलायम असायला हवेत. तसंच तीन लेअर्स असणं आवश्यक आहे. तुमचा मास्क वॉटरप्रुफ असावा. कारण एका रिसर्चनुसार ओला मास्क वापरणं नुकसानकारक ठरू शकतं. 

How you can test your triple layer mask is real and effective in corona virus cases | मास्कच्या वापराबाबत 'या' गोष्टी माहीत असतील तरच होईल संक्रमणापासून बचाव; वेळीच सावध व्हा

मास्कच्या वापराबाबत 'या' गोष्टी माहीत असतील तरच होईल संक्रमणापासून बचाव; वेळीच सावध व्हा

googlenewsNext

कोरोनाकाळात मास्क हा सगळ्यांच्यात जीवनातील महत्वपूर्ण भाग ठेवला आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यसाठी ट्रिपल लेअर मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. असा मास्क वापरल्यानं कोरोनापासून बचाव केला जाऊ शकतो. ट्रिपल  लेअर मास्कच्या वापराचे अनेक फायदे आहेत. पहिली टेस्ट म्हणजेच व्हिजूअल टेस्ट म्हणजेच मास्कचे कापड वॉशेबल आणि मऊ मुलायम असायला हवेत. तसंच तीन लेअर्स असणं आवश्यक आहे. तुमचा मास्क वॉटरप्रुफ असावा. कारण एका रिसर्चनुसार ओला मास्क वापरणं नुकसानकारक ठरू शकतं. 

मास्कला जास्त छिद्र असायला नकोत. जास्तवेळ मास्कचा वापर केल्यास असा मास्क फेकून द्या. एकदा वापरल्यानंतर धुतल्याशिवाय मास्कचा वापर करू नका. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईल्सचे मास्क उपलब्ध आहेत. अशा मास्कचा वापर करणं टाळा. सध्या आरोग्य मंत्रालयाने एन-९५ मास्क कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कुचकामी असल्याचे सांगितले आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा मास्क कोरोनाचा फैलाव रोखण्याच्याबाबतीत निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत विविध राज्ये आणि केंद्रशासित राज्यांना पत्र लिहून वापराबाबत सूचना केली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक राजीव गर्ग यांनी याबाबतचे पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माधयमातून  व्हॉल्व्ड रेस्पिरेटर लावलेल्या मास्कबाबत इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकारचा मास्क कोरोनाचा फैलाव रोखू शकत नाही. तसेच ही बाब कोविड-१९ ला रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या विपरित आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

एन-९५ मास्कचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी सामान्य लोकांकडून करण्यात येत आहे. तसेच या मास्कचा वापर हा चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. विशेषकरून असे एन-९५ मास्क वापरले जात आहेत जे छिद्रयुक्त आहेत. त्यांच्यामध्ये व्हॉल्व्ड रेस्पिरेटर बसवलेला आहे. अशा प्रकारचे छिद्रयुक्त मास्क कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अगदी विरुद्ध आहेत. कारण या छिद्रातून कोरोना विषाणू बाहेर येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मी आग्रह करतो की, राज्यांनी फेस आणि माऊथ कव्हरच्या वापराचे पालन करण्याबाबत आदेश द्यावेत, तसेच एन-९५ मास्कच्या चुकीच्या वापराला थांबवावे, अशी सूचना गर्ग यांनी केली आहे.

अशा स्थितीत घरगुती मास्कचा वापर करणंच फायद्याचं ठरेल किंवा बाजारातून मास्क विकत घेताना तो मास्क ट्रिपल लेअर्सचा असावा याची खात्री करून घ्या. घरी तयार केलेले मास्क जास्त फायदेशीर ठरतील कारण त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत नाही. कारण त्यासाठी सुती कापडाचा वापर केला जातो. जर मास्क घातल्यानंतर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर सुरक्षित ठिकाणी आराम करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. मास्कशिवाय घराबाहेर पडू नका. मास्क गरजेपेक्षा जास्त घट्ट बांधू नका.

फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी

धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण

Web Title: How you can test your triple layer mask is real and effective in corona virus cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.