औषध विक्रेत्यांचा शंभर टक्के बंद ऑनलाईन औषध विक्रीला विरोध : अत्यावश्यक सेवेचा अनेकांनी घेतला लाभ

By Admin | Published: October 14, 2015 10:16 PM2015-10-14T22:16:30+5:302015-10-14T22:51:28+5:30

जळगाव : देशात व राज्यात बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणार्‍या ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या संघटनेने (एआयओसीडी) बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी देशभर पुकारलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. दरम्यान, गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात आलेल्या आपत्कालीन सेवेला मोठा प्रतिसाद मिळाला.

Hundred per cent of drug vendors protest against online drug sales: Many of the benefits taken from the essential service | औषध विक्रेत्यांचा शंभर टक्के बंद ऑनलाईन औषध विक्रीला विरोध : अत्यावश्यक सेवेचा अनेकांनी घेतला लाभ

औषध विक्रेत्यांचा शंभर टक्के बंद ऑनलाईन औषध विक्रीला विरोध : अत्यावश्यक सेवेचा अनेकांनी घेतला लाभ

googlenewsNext

जळगाव : देशात व राज्यात बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणार्‍या ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या संघटनेने (एआयओसीडी) बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी देशभर पुकारलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. दरम्यान, गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात आलेल्या आपत्कालीन सेवेला मोठा प्रतिसाद मिळाला.
ऑनलाईन औषध विक्री थांबत नसल्याने संघटनेने बुधवारी बंद पुकारला होता. या बंदमध्ये जळगाव जिल्‘ातील २५०० पैकी २४५० विक्रेते सहभागी झोल होते, तर उर्वरित दुकान आपत्कालीन प्रसंगी औषधी उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू ठेवण्यात आली होती. बंद दरम्यान केमिस्ट भवन बाहेर बसून सर्व केमिस्ट बांधवांनी धरणे आंदोलन केले.
लढा शासनाविरुद्ध
ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आमचा शासनाविरुद्ध लढा आहे, यात जनतेला वेढीस धरण्याचा कोणताही हेतू नाही, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून संघटनेच्यावतीने आपत्कालीन सेवा सुरु ठेवण्यात आली होती, असे संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी सांगितले.
...तर बेमुदत बंद
आजचा बंद केवळ एक टोकन होते, देशभरात याला मोठा प्रतिसाद मिळाला. यापुढेही जर ऑनलाईन औषध विक्री थांबली नाही तर बेमुदत बंद पुकारण्यात येईल असे, असे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे कार्यकारीणी सदस्य सुनील भंगाळे यांनी दिला आहे.
अत्यावश्यक सेवेला प्रतिसाद
या बंदच्या काळात गरजू रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे शहरात वेगवेगळ्या परिसरात व्यवस्था करण्यात आली होती. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागानेदेखील सेवा उपलब्ध केली होती. या कक्षात साहाय्यक आयुक्त भु.पो.पाटील, औषध निरीक्षक अ.मा. माणिकराव यांनी काम पाहिले. या सेवेला मोेठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासून रात्रीपर्यंत येथील दूरध्वनीवर रुग्णांनी संपर्क साधत या सेवेचा लाभ घेतला. येथे संपर्क साधल्यानंतर रुग्णांना त्या-त्या परिसरातील आपत्कालीन सेवा म्हणून सुरू असलेल्या मेडिकलची माहिती देण्यात येत होती.
बंद यशस्वी करण्यासाठी सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हा पादाधिकारी, तालुकाध्यक्ष, सचिव यांच्यासह झोन प्रमुख राजीव चौधरी, अनिल कोळंबे, साहेबराव भोई, बाळू सोनवणे, दिनेश चौधरी, खलीद सैयद, राजेंंद्र पाटील, दिनेश मालू, परिमल पाटील, प्रवीण कोठावदे, प्रकाश चव्हाण, सनी मंथान, अमर लुल्ला, विलास नेहेते, विजय खडके,योगेश कलराणी आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Hundred per cent of drug vendors protest against online drug sales: Many of the benefits taken from the essential service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.