कच्च्या कांद्यामुळे फैलावणाऱ्या 'साल्मोनेला' आजाराची वाढतेय दहशत, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 05:37 PM2021-10-25T17:37:30+5:302021-10-25T17:37:39+5:30
पांढऱ्या आणि पिवळ्या कांद्यामध्ये साल्मोनेला आढळून आला आहे. तेथे ज्या लोकांच्या घरात लाल, पिवळा आणि पांढरा कांदा आहे, त्यांनी ते फेकून द्यावेत, असा सल्ला सीडीएसने दिला आहे. सीडीएसला असे आढळून आले आहे की, सॅल्मोनेलाच्या (what is salmonella) संपर्कात आलेल्या ७५ टक्के लोकांनी कच्चा कांदा खाल्ला होता.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत साल्मोनेलाचा (salmonella) प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. अमेरिकेच्या ३७ राज्यांमध्ये साल्मोनेलामुळे ६५० लोक आजारी पडले आहेत. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDS) ने यासाठी कांदा हा मुख्य स्त्रोत मानला आहे. वेबएमडीच्या बातमीनुसार, सीडीएसने म्हटले आहे की, मेक्सिकोमधून आयात केलेल्या कांद्यामध्ये साल्मोनेलाचा स्रोत सापडला आहे. लाल, पांढऱ्या आणि पिवळ्या कांद्यामध्ये साल्मोनेला आढळून आला आहे. तेथे ज्या लोकांच्या घरात लाल, पिवळा आणि पांढरा कांदा आहे, त्यांनी ते फेकून द्यावेत, असा सल्ला सीडीएसने दिला आहे. सीडीएसला असे आढळून आले आहे की, सॅल्मोनेलाच्या संपर्कात आलेल्या ७५ टक्के लोकांनी कच्चा कांदा खाल्ला होता.
साल्मोनेला दूषित पाणी किंवा अन्नामुळे होतो
साल्मोनेला संसर्ग किंवा साल्मोनेलोसिस हा एक सामान्य जीवाणूजन्य रोग आहे. ज्यामुळे अन्न विषबाधा होते. हा आजार पचनसंस्थेवर हल्ला करतो, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. साल्मोनेला जीवाणू सामान्यतः प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतात आणि मानवाच्या शरीरातून पचनमार्गातून बाहेर जाते. साल्मोनेला दूषित पाणी किंवा अन्नाचे सेवन करून मानवांना या रोगाची लागण होऊ शकते.
साल्मोनेला रोगाचे कारण
कच्चे मांस, चिकन इत्यादी खाल्ल्याने साल्मोनेला होऊ शकतो. कच्च्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया देखील असू शकतात, म्हणून कच्ची फळे आणि भाज्या खाताना काळजी घेणं आवश्यक आहे. अनपेस्चराइज्ड दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देखील साल्मोनेलाचे कारण असू शकतात. मऊ चीज, आइस्क्रीम आणि ताकात साल्मोनेला असू शकतो. कच्चे अंडे देखील साल्मोनेलाचे कारण असू शकते. आपण आपले हात नीट स्वच्छ केले नाही तरी साल्मोनेला संसर्ग होऊ शकतो. साल्मोनेला सामान्यतः प्राण्यांमध्ये आढळतो, म्हणून पाळीव प्राणी देखील साल्मोनेला वाहक असू शकतात.
या आजारात काय होते
साल्मोनेला संसर्गामुळे, बहुतेक लोक अतिसार, ताप किंवा ओटीपोटात क्रॅम्पची तक्रार करतात. त्याची लक्षणे शरीरात सहा तास ते सहा दिवसांदरम्यान दिसतात. या बॅक्टेरियाचे काही प्रकार अतिशय धोकादायक असतात आणि ते मूत्र, रक्त, हाडे आणि मज्जासंस्थेवरही हल्ला करतात. या परिस्थितीत हे प्रकरण खूप धोकादायक असू शकते. सीडीएसने असा सल्ला दिला आहे की, जर डायरिया तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
उपचार काय आहे
सहसा हा संसर्ग काही दिवसांनी बरा होतो. काही प्रकरणांमध्ये, डॉक्टरांना भेटणे आवश्यक असेल. डॉक्टर प्रतिजैविक घेण्याची शिफारस करतात. या संसर्गामध्ये अतिसार होतो, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. म्हणूनच तुम्ही भरपूर पाणी प्यावे.