प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो? जाणून घ्या कारणे आणि उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 11:47 AM2018-10-15T11:47:33+5:302018-10-15T11:47:51+5:30

गरमीच्या दिवसात जास्त घाम येणे सामान्य बाब आहे. पण तसं नसेल तरी तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल तर गंभीर बाब असू शकते. अनेकदा याकडे लोक फार गंभीरतेने घेत नाहीत.

Hyperhidrosis symptoms, causes, diagnosis and treatment | प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो? जाणून घ्या कारणे आणि उपाय!

प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो? जाणून घ्या कारणे आणि उपाय!

googlenewsNext

गरमीच्या दिवसात जास्त घाम येणे सामान्य बाब आहे. पण तसं नसेल तरी तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल तर गंभीर बाब असू शकते. अनेकदा याकडे लोक फार गंभीरतेने घेत नाहीत. त्यामुळे त्यांना पुढे त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया जास्त घाम येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय....

घाम की हायपरिड्रोसिस

शरीरातून घाम येणे किंवा खूप जास्त घाम येणे या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत. जास्त घाम येण्याच्या स्थितीला सामान्यपणे हायपरिड्रोसिस म्हटले जाते. घाम येणे ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे. जर एखाद्या व्यक्तीचं शरीर वेगळ्या प्रकारे काम करत असेल तर त्याला जास्त घाम येतो. तसं पहायला गेलं तर जास्त घाम आल्याने याचा शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही. पण यामुळे व्यक्तीला नेहमी अडचणींचा सामना करावा लागतो.

जाणून घ्या कारण

डॉक्टरांनी सांगितले की, जास्त घाम येण्यामागे अनेकदा नर्वस सिस्टमचाही हात असतो. अनेकांच्या हातांना आणि पायांना जास्त घाम येतो. असे शरीराच्या कार्यप्रणालीत थोडा बिघाड झाल्याने होतं. पण याने घाबरण्याची गरज नाही. या समस्येचं निदान करण्यासाठी शल्य चिकित्सा करुन घामाच्या ग्रंथी काढल्या जातात, याने त्या व्यक्तीला भविष्यात जास्त घामाची समस्या होत नाही. 

तर काही व्यक्तींमध्ये मासिक पाळी, गर्भावस्था, थॉयराईड, टयूबरकुलोसिस, स्टोक, पार्किसंस रोग, ल्यूकेमिया आणि लिम्फोमा यामुळेही जास्त घाम येत असल्याचे बघायला मिळते. 

डॉक्टरांचा घ्या सल्ला

तसा तर घाम येण्यावर काही घरगुती उपायही शक्य आहेत. पण काही लक्षणे अशी असतात ते पाहून डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 

१) रात्री झोपताना अधिक घाम येणे

२) तुमच्या शरीराच्या केवळ एकाच भागात जास्त घाम येणे

३) शरीराच्या प्रत्येक अंगाला प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे

४) काही औषधे घेतल्यावर जास्त घाम येणे

५) कधी खूप जास्त घाम येऊन हैराण होणे

काय कराल उपाय

तशी तर जास्त घाम येण्याची समस्या सर्जरी करुनच दूर केली जाते. पण हायपरिड्रोसिसची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी काही वेगळे उपचारही केले जाऊ शकतात. जसे की डॉक्टरांच्या सल्ल्याने स्प्रे, लोशन, रोल-ऑन इत्यादी वापरु शकता. याने जास्त घामाची समस्या नियंत्रणात ठेवता येते. 
 

Web Title: Hyperhidrosis symptoms, causes, diagnosis and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.