2024 मध्ये भारताला मिळू शकते टीबीची प्रभावी लस; ICMR करतंय 2 चाचण्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:49 AM2022-04-01T11:49:29+5:302022-04-01T11:50:50+5:30

Tuberculosis : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) देशात टीबीच्या दोन लसींची चाचणीही सुरू आहे. ही चाचणी 6 राज्यांमध्ये केली जात आहे.

icmr conducts trials of tuberculosis tb vaccines in india 6 states | 2024 मध्ये भारताला मिळू शकते टीबीची प्रभावी लस; ICMR करतंय 2 चाचण्या 

2024 मध्ये भारताला मिळू शकते टीबीची प्रभावी लस; ICMR करतंय 2 चाचण्या 

Next

नवी दिल्ली : प्राणघातक क्षयरोग किंवा टीबीवरील (Tuberculosis) सध्याचा उपचार अद्याप लांब आहे. अशा परिस्थितीत आता भारतातील शास्त्रज्ञांनी टीबीवर प्रभावी लस विकसित करण्याचा दावा केला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) देशात टीबीच्या दोन लसींची चाचणीही सुरू आहे. ही चाचणी 6 राज्यांमध्ये केली जात आहे. दरम्यान, जर सर्व काही ठीक झाले तर 2024 पर्यंत भारताला टीबीची प्रभावी लस मिळू शकेल, असे मानले जात आहे. 

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, पुणे येथील नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) येथील शास्त्रज्ञ ई डॉ सुचित कांबळे म्हणाले की, "आम्हाला पूर्ण विश्वास आहे की भारताला चांगली लस मिळेल आणि त्यानंतर भारतात टीबीचा प्रसार रोखण्यात मदत मिळू शकेल"

याचबरोबर, आयसीएमआर देशातील 6 राज्यांमध्ये 18 ठिकाणी फेज 3 डबल ब्‍लाइंड प्‍लासीबो कंट्रोल ट्रायल घेत आहे. महाराष्ट्रातही ते 2 ठिकाणी केले जात आहे. ज्या सहा राज्यांमध्ये या चाचण्या घेतल्या जात आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे, असे अशी माहिती देण्यात आली आहे. 

आयसीएमआर ज्या दोन टीबी लसींची चाचणी घेत आहे, ते व्हीपीएम 1002 आणि इम्यूवॅक आहेत. डॉ. कांबळे म्हणाले की, आमच्या साइटवर शेवटची नोंदणी 2024 मध्ये होईल. आम्ही सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर आम्ही रुग्णांची आकडेवारी जाहीर करू. त्यानंतर विश्लेषण केले जाईल आणि त्याचा अंतिम निकाल मिळेल. या चाचणीत 6 वर्षांवरील लोकांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Web Title: icmr conducts trials of tuberculosis tb vaccines in india 6 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य