तुमच्या किचनमध्ये तर नाही ना 'या' 3 जीवघेण्या गोष्टी, ICMR चा सावध राहण्याचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 09:49 AM2024-10-26T09:49:06+5:302024-10-26T09:49:57+5:30
Unhealthy Foods : रोज वापरल्या जाणाऱ्या अनेक फूड्सना 'अल्ट्रा-प्रोसेस्ड' कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. हा रिपोर्ट लोकांसाठी महत्वाचा इशारा आहे. कारण यात अशा अनेक फूड्सचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचं लोक रोज सेवन करतात.
Unhealthy Foods : बरेच लोक सहज म्हणून जातात की, 'सगळं खायला हवं, काहीच होत नाही'. मात्र, खाण्या-पिण्याला इतकं सहज घेणं आजकाल परवडणारं नाही. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने नुकताच एक धक्कादायक रिपोर्ट जारी केला आहे. ज्यात रोज वापरल्या जाणाऱ्या अनेक फूड्सना 'अल्ट्रा-प्रोसेस्ड' कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. हा रिपोर्ट लोकांसाठी महत्वाचा इशारा आहे. कारण यात अशा अनेक फूड्सचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचं लोक रोज सेवन करतात. या फूड्समध्ये ब्रेड, बटर आणि कुकिंग ऑयल यांचाही समावेश आहे.
ICMR च्या रिपोर्टनुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स म्हणजे ज्या पदार्थांमध्ये जास्त फॅट, शुगर आणि मीठ असतं. या पदार्थांमध्ये फायबर आणि पोषक तत्व कमी असतात. तसेच यांमध्ये अनेकदा केमिकल तत्व, प्रिजर्वेटिव्स आणि एडिटिव्सही असतात. जेणेकरून ते जास्त दिवस टिकावे. याचा परिणाम असा होतो की, असे फूड्स आपल्या शरीरात आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात.
कोणते पदार्थ अल्ट्रा-प्रोसेस्ड?
ICMR च्या रिपोर्टमध्ये अशा फूड्सना अल्ट्रा-प्रोसेस्ड कॅटेगरीमध्ये सामिल करण्यात आलं आहे. जे सामान्यपणे लोक रोज वापरतात.
- कमर्शियल ब्रेड
- ब्रेकफास्ट सीरियल्स
- केक, पेस्ट्री आणि बिस्कीट
- चीप्स आणि फ्राइज
- जॅम, जेली आणि सॉस
- कमर्शियल आइसक्रीम
- प्रोटीन पावडर
- पीनट बटर
- सोया चंक्स आणि टोफू
- फ्रोजेन फूड
- कमर्शियल पनीर
- पॅकेज्ड मीट
- वनस्पती तेल आणि रिफाइंड तेल
- रिफाइंड शुगर आणि मीठ
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचे आरोग्यावर प्रभाव
ICMR नुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचं जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा, हृदयरोग, टाइप 2 डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. यातील ट्रान्स फॅट्स आणि केमिकल्स शरीरात अनावश्यक फॅट जमा करतात जे हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या निर्माण करतात. या पदार्थांचं नियमित सेवन केल्याने शरीरात पोषक तत्व कमी होतात.
ICMR ने काय दिला सल्ला?
ICMR ने रिपोर्टमध्ये लोकांना सल्ला दिला आहे की, त्यांनी अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचं सेवन कमी प्रमाणात करावं. त्याजागी नॅचरल, ताज्या आणि पौष्टिक पदार्थांचं सेवन वाढवा. ताजी फळं, भाज्या, कडधान्य आणि वेगवेगळ्या डाळींचा आहारात समावेश करा.