डाळ शिजवताना चूक केली तर नष्ट होईल सगळं प्रोटीन, ICMR सांगितली योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 09:28 AM2024-06-20T09:28:07+5:302024-06-20T09:28:42+5:30

Right Way To Cook Pulses: सामान्यपणे डाळी शिजवून किंवा भिजत घालून सेवन केल्या जातात. पण अनेकदा डाळी बनवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्यातील प्रोटीन नष्ट होतं.

ICMR guideline for right way to cook pulses to get maximum benefits | डाळ शिजवताना चूक केली तर नष्ट होईल सगळं प्रोटीन, ICMR सांगितली योग्य पद्धत

डाळ शिजवताना चूक केली तर नष्ट होईल सगळं प्रोटीन, ICMR सांगितली योग्य पद्धत

Right Way To Cook Pulses: डाळी भारतीय लोकांच्या आहारातील महत्वाचा भाग असतात. डाळींमधून भरपूर प्रोटीन मिळतं. डाळ भात असो, चपातीसोबत असो डाळींचं सेवन केलं जातं. इतरही अनेक पद्धतीने डाळींचं सेवन केलं जातं. सामान्यपणे डाळी शिजवून किंवा भिजत घालून सेवन केल्या जातात. पण अनेकदा डाळी बनवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्यातील प्रोटीन नष्ट होतं. अशात ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने डाळी बनवण्याच्या योग्य पद्धतीबाबत सांगितलं आहे. जेणेकरून डाळींमधील पौष्टिक तत्व शरीराला मिळावेत.

बॉयलिंग किंवा प्रेशर कुकिंग

ICMR नुसार डाळींची क्वालिटी कामय ठेवण्यासाठी डाळी बनवण्यासाठी बॉयलिंग किंवा प्रेशर कुकिंग दोन्ही पद्धती योग्य आहेत. या दोन्ही पद्धतीने डाळी शिजवल्या तर डाळीतील फायटिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळते. डाळींमधील फायटिक अ‍ॅसिड शरीरात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक आणि आयर्नसारख्या महत्वाच्या मिनरल्सचं अवशोषण होण्यात अडचण आणतं.

जास्त उकडणं योग्य नाही

ICMR नुसार डाळी फार जास्त उकडणंही योग्य नाही. डाळी जास्त उकडल्याने त्यांची टेस्ट बिघडते सोबतच अनेक तत्व नष्ट होतात. जास्त उकडल्याने डाळींमधील प्रोटीनची क्वालिटी खराब होते.

किती पाणी टाकावं?

ICMR नुसार, डाळी शिजवताना प्रेशर कुकरमध्ये इतकं पाणी टाकावं जेणेकरून डाळ त्यात व्यवस्थित बुडेल. याने पोषक तत्वही कायम राहतील आणि डाळीचं पाणी प्रेशर कुकरमधून बाहेरही येणार नाही. या पद्धतीने डाळ शिजवली तर कधी पातळ किंवा कधी घट्ट होण्याची समस्याही होणार नाही. जर तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवत असाल तर एक कप डाळीमध्ये दोन ते तीन कप पाणी टाकावं आणि जर तुम्ही पातेल्यात डाळ शिजवत असाल तर एक कप डाळीमध्ये चार कप पाणी टाकावं.

Web Title: ICMR guideline for right way to cook pulses to get maximum benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.