सावधान! ब्रेड, बटर आणि कुकिंग ऑईलचं अतिसेवन घातक; 'या' आजारांचा मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 01:44 PM2024-06-06T13:44:09+5:302024-06-06T13:45:38+5:30

ICMR नुसार, ग्रुप C च्या खाद्यपदार्थांमध्ये ब्रेड, केक, चिप्स, बिस्किट, फ्राईज, जॅम, सॉस, मेयोनीझ, आईस्क्रीम, प्रोटीन पॅक पावडर, पीनट बटर, सोया चंक्स, टोफू यांसारख्या फॅक्ट्रीमध्ये बनवलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे

icmr put bread butter cooking oil in category of sea food termed it as dangerous for health | सावधान! ब्रेड, बटर आणि कुकिंग ऑईलचं अतिसेवन घातक; 'या' आजारांचा मोठा धोका

सावधान! ब्रेड, बटर आणि कुकिंग ऑईलचं अतिसेवन घातक; 'या' आजारांचा मोठा धोका

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) आपल्या गाईडलाईन्समध्ये ब्रेड, बटर आणि कुकिंग ऑईलसह काही खाद्यपदार्थांचा समावेश हा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्सच्या कॅटेगिरीमध्ये केला आहे, ते लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं म्हटलं आहे.

ICMR नुसार, ग्रुप C च्या खाद्यपदार्थांमध्ये ब्रेड, केक, चिप्स, बिस्किट, फ्राईज, जॅम, सॉस, मेयोनीझ, आईस्क्रीम, प्रोटीन पॅक पावडर, पीनट बटर, सोया चंक्स, टोफू यांसारख्या फॅक्ट्रीमध्ये बनवलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. ICMR ने चीज, बाजरी आणि सोयाबीनचे प्रक्रिया केलेले पीठ, एनर्जी ड्रिंक्स, दूध, कोल्ड्रिंक्स, ज्यूस यासारख्या गोष्टींना ग्रुप सी कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे.

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स म्हणजे काय?

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हे आरोग्यासाठी चांगले नाहीत कारण ते फॅक्ट्रीमध्ये हाय फ्लेमवर तयार केले जातात. ते बरेच दिवस खराब होऊ नये म्हणून त्यात आर्टिफिशियल इनग्रिडिएंट आणि एडिटिव्स मिसळले जातात. तसेच ताजी फळं खराब होऊ नयेत म्हणून अनेक दिवस ती फ्रीज केली जातात. दूध पाश्चराइज्ड देखील केलं जातं. ही सर्व प्रक्रिया अन्नातून पोषक तत्वं काढून घेते. तर उत्पादनाची चव, रंग आणि गुणवत्ता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी ते आर्टिफिशियल स्वीटनर, कलर, एडिटिव्स मिसळतात जे आरोग्यासाठी घातक आहे. 

अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे होतात हे आजार 

अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचे दीर्घकाळ सेवन केल्याने लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळतं. या अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्समध्ये (UPF) फॅटचे प्रमाण जास्त असते आणि फायबरसह आवश्यक पोषकतत्त्वे अत्यंत कमी असतात. रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की अशा गोष्टींमुळे लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह यासारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

सर्वात मोठी समस्या अशी आहे की असे खाद्यपदार्थ साधारणपणे खूप स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात, ज्यामुळे ते लोकांसाठी एक लोकप्रिय पर्याय बनतात. ICMR ने C कॅटेगिरीच्या पदार्थांचं जास्त सेवन टाळण्याची शिफारस केली आहे, याचा अर्थ या पदार्थांमध्ये साखर आणि मीठ जास्त आहे आणि जीवनसत्त्वे आणि फायबर यांसारखे पोषक घटक कमी आहेत.
 

Web Title: icmr put bread butter cooking oil in category of sea food termed it as dangerous for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.