एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम करता? ICMR चा इशारा हृदरोग आणि कॅन्सरचा वाढतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 10:07 AM2024-05-18T10:07:32+5:302024-05-18T10:18:09+5:30

तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यात विषारी तत्वा तयार होतात जे हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका वाढवतात.

ICMR told repeated heating of oil can cause cancer and heart problem | एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम करता? ICMR चा इशारा हृदरोग आणि कॅन्सरचा वाढतो धोका

एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम करता? ICMR चा इशारा हृदरोग आणि कॅन्सरचा वाढतो धोका

अनेकदा घरात काही पदार्थ बनवताना किंवा काही तळल्यानंतर शिल्लक राहिलेलं तेल वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकत्याच याबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यांच्यानुसार वनस्पती तेल किंवा कोणत्याही प्रकारचं तेल पुन्हा पुन्हा गरम करणं टाळलं पाहिजे. तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यात विषारी तत्वा तयार होतात जे हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका वाढवतात.

आधीच्या काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, कशाप्रकारे जेवण बनवण्यासाठी वापरलं जाणारं तेल पुन्हा गरम केल्याने त्यातून विषारी पदार्थ रिलीज होतात आणि शरीरात फ्री रॅडिकल्स वाढवू शकतात. ज्यामुळे सूज आणि वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका होतो.

आयसीएमआरने राष्ट्रीय पोषण संस्थेसोबत मिळून वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी 17 नवीन आहार गाइडलाईन जारी केल्या जेणेकरून त्यांना चांगला आहार निवडवण्याची मदत मिळावी. 

तेल पुन्हा पुन्हा गरम केल्या कॅन्सर-हृदयरोगाचा धोका

गाइडलाईनमध्ये सांगण्यात आलं आहे की, जेवण बनवण्यासाठी किंवा काही तळण्यासाठी एकदा वापरलेलं वनस्पती तेल पुन्हा पुन्हा वापरण्याची पद्धत जवळपास सगळ्याच घरांमध्ये आहे. कुणीही एकदा वापरलेलं तेल फेकून देत नाहीत. रिपोर्टनुसार, तेल पुन्हा पुन्हा गरम गेल्याने त्यात असे काही तत्व तयार होतात जे विषारी असतात. त्यांमुळे हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका वाढतो. उच्च तापमानावर तेलातील फॅट ट्रान्स फॅटमध्ये बदलतं. ट्रान्स फॅटमध्ये एक नुकसानकारक फॅट आहे. ज्यामुळे हृदयाच्या वेगवेगळ्या समस्या होतात. 

तेल गरम करण्याबाबत आयसीएमआरने काय सांगितलं?

आयसीएमआरने सांगितलं की, या तेलाचा वापर आज भाज्या बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. पण तेलात अनेकदा काही गोष्टी फ्राय केल्यावर पुन्हा त्यात काही फ्राय करण्यासाठी ते तेल वापरू नका. त्याशिवाय असंही सांगण्यात आलं की, एकदा फ्राय केल्यावर ते शिल्लक राहिलेलं तेल एक ते दोन दिवसात वापरून संपवा.

एक्सपर्टनी सांगितलं की, तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने ट्रान्स फॅट आणि एक्रिलामाइड सारखे नुकसानकारक तत्व तयार होतात. जे कॅन्सरचा धोका वाढवतात. तसेच शरीरात सूज येते व लिव्हरलाही इजा होऊ शकते. 

Web Title: ICMR told repeated heating of oil can cause cancer and heart problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.