या तीन लक्षणांवरून ओळखा कॉलेस्ट्रोलचा धोका, हार्टॲटकचेही ठरू शकते कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:22 PM2021-06-01T19:22:01+5:302021-06-01T19:23:28+5:30
रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या वाढलेल्या प्रमाणाचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होतो. परिणाम हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे.
कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. याची निर्मिती यकृत (लिव्हर) मध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते. याची निर्मिती गरजेइतकीच झाली तर आपल्या स्वास्थ्यासाठी योग्य ठरतं. पण गरजेपेक्षा अधिक निर्मिती झाल्यास ते शरीरात साठू लागते आणि अनेक आजारांना निमंत्रण देते. रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या वाढलेल्या प्रमाणाचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होतो. परिणाम हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे माहित असणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊया काही लक्षणे जी कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत देतात...
हात दुखणे
कॉलेस्ट्रॉल वाढले की ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. यामुळे एथेरोस्क्लेरोसिसची स्थीती निर्माण होते. त्यामुळे हात दुखु लागतात. आपल्यालाही अशी समस्या जाणवत असेल तर डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
चेहऱ्यावरील खुणा
तुम्हाला तुमच्या डोळ्याखाली पिवळ्या रंगाचे स्पॉट्स दिसत असतील तर तेही कॉलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण असू शकते. असे डाग जर तुम्हाला तुमच्या हाताच्या कोपरावरही दिसत असतील तर वेळीच सावध व्हा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
डोळ्यांमध्ये जाणवतात लक्षणे
तुमच्या डोळ्यांमध्ये जर तुम्हाला काही बदल जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बरेचदा हा दृष्टीरोग म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते पण, हे खरंतर कॉलेस्ट्रॉल वाढीचे लक्षण असू शकते. यात डोळ्यात बुब्बुळाच्या बाजूला विशिष्ट असा डाग दिसू शकतो. हे बरेचदा चाळीशीनंतर होते पण याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.