मुलांमधील साखरेचा वेळीच ओळखा धोका! Type 1 Diabetes म्हणजे काय?, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 07:53 AM2022-06-12T07:53:18+5:302022-06-12T07:53:41+5:30

गेल्या तीस वर्षांमध्ये भारतात मधुमेहाच्या घटनांमध्ये अपवादात्मक वाढ झाली आहे. टाइप १ डायबेटिस किंवा इन्सुलिनवर अवलंबून राहावे लागणारे मधुमेह ...

Identify the dangers of sugar in children at the right time What is Type 1 Diabetes | मुलांमधील साखरेचा वेळीच ओळखा धोका! Type 1 Diabetes म्हणजे काय?, जाणून घ्या सविस्तर...

मुलांमधील साखरेचा वेळीच ओळखा धोका! Type 1 Diabetes म्हणजे काय?, जाणून घ्या सविस्तर...

googlenewsNext

गेल्या तीस वर्षांमध्ये भारतात मधुमेहाच्या घटनांमध्ये अपवादात्मक वाढ झाली आहे. टाइप १ डायबेटिस किंवा इन्सुलिनवर अवलंबून राहावे लागणारे मधुमेह असलेल्या मधुमेही रुग्णांसंदर्भात देश जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अलीकडील अहवालांनुसार असे निदर्शनास आले आहे की, टाइप १ डायबेटिस हा १४ वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आला आहे. 

टाइप १ डायबेटिस म्हणजे काय?
हा ऑटोइम्यून आजार आहे, जो प्रपाचिक पिंडाला इन्सुलिन निर्माण करण्यास प्रतिबंध करतो. इन्सुलिन हे एक हार्मोन आहे, जे पेशींमध्ये ग्लुकोज जाण्यास आणि पेशींना ऊर्जा देण्यास मदत करते. इन्सुलिनशिवाय शर्करा रक्तामध्ये राहते. हा गंभीर आजार (आजीवन राहणारा) आहे, म्हणूनच दररोज औषधी, इन्सुनिल शॉटस् व रक्तातील शर्करेचे मॉनिटरिंग आवश्यक असते. टाइप १ डायबेटिस मुले व प्रौढ व्यक्ती अशा दोघांना होऊ शकतो.

कारणीभूत घटक
टाइप १ डायबेटिसचे कारण अज्ञात आहे, काही ज्ञात घटक आहे फॅमिली हिस्ट्री, आनुवंशिक व विशिष्ट विषाणू, जे आयलेट पेशींची ऑटोइम्यून क्षमता 
वाढवतात, त्यामुळे आयलेट पेशी नाश पावतात. तसेच रक्तामध्ये थोडीशी शर्करा वाढलेली मुले वैद्यकीय तपासणीसाठी येत नाहीत. ज्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.

टाइप १ डायबेटिसच्या लक्षणांची सुरुवात सामान्यत: सौम्यपणे होते आणि स्वादुपिंड कमी-कमी इन्सुलिन निर्मिती करू लागल्यानंतर अधिक तीव्र होतात. 

काय आहेत लक्षणे?
० सतत तहान लागणे
० वारंवार लघवी होणे, मुलांना अंथरुणामध्ये लघवी होणे
० खूप भूक लागणे
० नकळतपणे वजन कमी होणे
० थकवा, द्विधा मन:स्थिती
० झोपेची गुंगी येत राहणे
० शुद्ध हरपणे

कसे करावे व्यवस्थापन?
० नियमितपणे रक्तातील शर्करेची तपासणी करा.
० प्रिस्क्राइब केल्याप्रमाणे इन्सुलिन द्या.
० मुलांना नियमित शारीरिक व्यायामामध्ये गुंतवा.
० संतुलित आहार द्या आणि ते भरपूर प्रमाणात पाणी पितात याबाबत खात्री घ्या.

- डॉ. अनिल भोरस्कर, सचिव, डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया (सायंटिफिक सेक्शन)

Web Title: Identify the dangers of sugar in children at the right time What is Type 1 Diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.