रिक्षा चालकाच्या मदतीने पटली जखमीची ओळख अनोळखी म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल : नातेवाईक येण्यापूर्वीच प्रौढ गेला निघून
By Admin | Published: March 29, 2016 12:24 AM2016-03-29T00:24:44+5:302016-03-29T00:24:44+5:30
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जखमी अवस्थेत पडलेल्या एका जखमीला रिक्षाचालक रवींद्र एकनाथ पवार यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने उपचार मिळण्यासह पवार यांच्याच प्रयत्नाने अनोळखी जखमीची ओळखदेखील पटली. पुरुषोत्तम पाटील असे त्यांचे नाव असून ते सुरतचे रहिवासी आहेत.
ज गाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जखमी अवस्थेत पडलेल्या एका जखमीला रिक्षाचालक रवींद्र एकनाथ पवार यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने उपचार मिळण्यासह पवार यांच्याच प्रयत्नाने अनोळखी जखमीची ओळखदेखील पटली. पुरुषोत्तम पाटील असे त्यांचे नाव असून ते सुरतचे रहिवासी आहेत. सोमवारी दुपारी एक ४० ते ४५ वर्षाचा प्रौढ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोक्याला मार लागलेल्या व वारंवार खाली पडत असलेल्या अवस्थेत रवींद्र पवार या रिक्षाचालकास आढलले. त्यांनी व्यवसाय सोडून तत्काळ मदत करीत रक्तबंबाळ अवस्थेतील जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे अनोळखी म्हणूनच नोंद करण्यात आली. उपचारादरम्यान जखमी अवस्थेतील प्रौढ वारंवार खाली पडत होता. तरीदेखील पवार हे त्याला स्ट्रेचरवर टाकत होते. उपचार होईपर्यंत ते तेथे थांबून होते. त्यानंतर त्यांनी जखमीच्या मोबाईलवरुन संपर्क साधला असता जखमीच्या पत्नीशी संपर्क झाला व अनोळखीची ओळख पटली. पुरुषोत्तम पाटील असे त्यांचे नाव असल्याचे समजले. ते लग्न सोहळ्यासाठी येथे आले असल्याचेही सांगण्यात आले.पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागलेला होता. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नातेवाईक जळगावला यायला निघायले. मात्र ते येण्यापूर्वीच संध्याकाळी पुरुषोत्तम पाटील हे जिल्हा रुग्णालयातून निघून गेले. त्यानंतर रवींद्र पवार हे प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात आले असता, जखमी येथून निघून गेल्याचे समजले. त्यामुळे आपला व्यवसाय सोडून जखमीचा जीव वाचावा म्हणून मदत केली, मात्र ते उपचार पूर्ण होण्यापूर्वीच निघून गेल्याचे वाईट वाटते, असे संकटावेळी धावून आलेल्या रवींद्र पवार यांनी सांगितले.