अँटिबायोटिकचा वापर गरज नसताना केल्यास...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 06:10 AM2023-12-01T06:10:15+5:302023-12-01T06:10:59+5:30
Antibiotics : विनाकारण अँटिबायोटिक्सचा वापर केल्यास डायरिया होण्याचा त्रास होऊ शकतो. थोडे दिवस प्रतीक्षा केल्यास शरीराची प्रतिकार क्षमताच आजारांशी लढते, असे ऑस्ट्रेलियातील अभ्यासकांनी म्हटले आहे.
सिडनी : अँटिबायोटिक ठराविक जीवाणूंच्या संसर्गांविरोधातच काम करते. ते विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गावर उपचाराचे काम करत नाही. अँटीबायोटिक घेतल्यास तात्पुरता दिलासा मिळेल, परंतु ते आजारातून लवकर बरे करत नाही. परंतु विनाकारण अँटिबायोटिक्सचा वापर केल्यास डायरिया होण्याचा त्रास होऊ शकतो. थोडे दिवस प्रतीक्षा केल्यास शरीराची प्रतिकार क्षमताच आजारांशी लढते, असे ऑस्ट्रेलियातील अभ्यासकांनी म्हटले आहे.
अनेक देशांमध्ये विरोध
- अनेक देशांमध्ये अँटिबायोटिकचा वापर न करण्यावर भर.
- डॉक्टरांकडून उपचार म्हणून ते लिहून न देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
असे बरे व्हा...
जगात पाचपैकी एक रुग्ण घशात खवखव झाल्यास अँटिबायोटिक घेतो. त्यामुळे रुग्णांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अँटिबायोटिक लिहून देतो, असे ४० टक्के डॉक्टर म्हणतात. परंतु हा आजार काही दिवसांमध्ये आपोआप बरा होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.