तुम्हाला बर्फ खाण्याची इच्छा होते का? असू शकते 'ही' समस्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 10:50 AM2019-04-18T10:50:50+5:302019-04-18T10:55:13+5:30

याकडे जर दुर्लक्ष केलं तर कोणत्याही गंभीर आजाराचं रुप घेऊ शकते. 

If you also feel like eating ice it can be problem | तुम्हाला बर्फ खाण्याची इच्छा होते का? असू शकते 'ही' समस्या...

तुम्हाला बर्फ खाण्याची इच्छा होते का? असू शकते 'ही' समस्या...

googlenewsNext

(Image Credit : Doctors Health Press)

जर तुम्हाला पुन्हा पुन्हा गोड खाण्याची इच्छा होत असेल, इच्छा होत असेल की, तोंडात बर्फाचा तुकडा ठेवावा किंवा बेडवर पडल्यावर बराचवेळी अस्वस्थ पडून राहत असाल तर हा सामान्य संकेत नाही. हे जाणून घेणे गरजेचे आहे. याने तुमच्या आरोग्याची स्थिती समजून येते. याकडे जर दुर्लक्ष केलं तर कोणत्याही गंभीर आजाराचं रुप घेऊ शकते. 

(Image Credit : Dental Plans)

१) तोंडात ठेवा बर्फाचा तुकडा - जर तुमचं सतत थंड पदार्थ खाण्याची जसे की, आइस्क्रीम, कुल्फी किंवा बर्फ खाण्याची इच्छा होत असेल तर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असू शकते. जर ही समस्या २ ते ३ महिन्यांपासून होत असेल तर याला आयर्न डेफिशिएंसी एनिमीया मानलं जातं. ही समस्या दूर करण्यासाठी किशमिश, चणे, मूंग खावेत. 

(Image Credit : Inside Outer Beauty)

२) ड्राय स्कीन असेल तर - हिवाळ्यात त्वचा शुष्क होणे सामान्य बाब आहे. पण जर उन्हाळ्यातही तुम्हाला स्कीन ड्रायनेसचा सामना करावा लागत असेल तर हा तुमच्या शरीरात खास व्हिटॅमिनची कमतरता असण्याचा संकेत आहे. काही लोक या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ब्यूटी क्रीम आणि ऑइलचा वापर करतात. पण ड्राय स्कीन ही समस्या व्हिटॅमिन ई ची कमतरतेचा संकेत आहे. ही कमतरता भरुन काढण्यासाठी पालक आणि बदाम भरपूर प्रमाणात खा. 

(Image Credit : thermofisher.com)

३) पुन्हा पुन्हा गोड खाण्याची इच्छा - पुन्हा पुन्हा गोड खाण्याची इच्छा होत असेल तर हा शरीरात ग्लूकोज कमी असल्याचा संकेत आहे. याची कमतरता झाली तर जास्त मिठाई खाऊ नये. जर तुम्हालाही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर मधाचं सेवन करा. कारण यात ग्लूकोज भरपूर प्रमाणात असतं. त्यासोबतच ही समस्या वेगवेगळी फळे खाऊनही दूर केली जाऊ शकते. 

(Image Credit : MedStoreLand)

४) झोपताना अस्वस्थता - बेडवर पडल्यावर अनेक तास जर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे कडा फिरवत असाल तर हा तुमच्या खराब जीवनशैलीचा संकेत आहे. या संकेतावरुन हे लक्षात येतं की, तुमच्यात पोटॅशिअमची कमतरता असू शकते. त्यासोबतच मांसपेशींमध्ये तणाव हा सुद्धा पोटॅशिअमच्या कमतरतेचा संकेत आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी डाएटमध्ये केळी, नारळाचं पाणी आणि बीटाचा समावेश करा. त्यासोबतच कलिंगड आणि खरबूजही खावे. 

(टिप - वरील लेखात दिलेले सल्ले हे केवळ माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातील कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना ही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला या उपायांचा फायदा होईलच असले नाही किंवा तसा दावाही आम्ही करत नाही.)

Web Title: If you also feel like eating ice it can be problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.