वजन कमी करताय?; तर बाहेर खाण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 04:54 PM2019-05-08T16:54:47+5:302019-05-08T16:55:41+5:30
वाढत्या वजनामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींना आपलं प्रत्येक पाऊल सांभाळून घ्यावं लागतं. आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्यासोबतच अनेक गोष्टी नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं.
वाढत्या वजनामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींना आपलं प्रत्येक पाऊल सांभाळून घ्यावं लागतं. आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्यासोबतच अनेक गोष्टी नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. अनेकदा वेट कंट्रोल डाएटवर असूनही बाहेरील जंक फूड किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर ते सर्व नियम आणि पथ्य विसरून जातात. रेस्टॉरंटमध्ये जे काही पदार्थ आपण खातो त्यांच्यामध्ये पोषक तत्व कमी प्रमाणात असतात. या पदार्थांमध्ये फॅट्स, तेल-मसाले, कॅलरी मोठ्या प्रमाणावर असतात. याच्या सेवनाने तुमची अनेक महिन्यांची मेहनतीवर पाणी फिरू शकतं. त्यामुळे तुम्हाला बाहेर काहीही खाताना अनेक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यामुळे तुमच्या डाएट प्लॅनला नुकसान होणार नाही आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण्याचा आनंदही घेऊ शकता.
कमी खा
अनेकदा स्वादिष्ट आणि फेवरेट खाण्या-पिण्याचे पदार्थ खाताना तोंडामध्ये पाणी येतं. अशातच जर थोडंसं खाल्लं तर काय होणार, असं आपल्याला वाटतं पण असं केल्याने तुमच्या डाएट प्लॅनचा बट्याबोळ होऊ शकतो. जेवण कितीही स्वादिष्ट असो किंवा तुमचा आवडीचा पदार्थ असो. जास्त सेवन करू नका. दररोज तुम्ही जेवढा आहार घेता तेवढाच घ्या. कमी खाल्याने अतिरिक्त कॅलरी घेण्यापासून बचाव करू शकता.
उपाशीपोटी रेस्टॉरटमध्ये जाऊ नका
जेव्हा तुम्ही उपाशी पोटी रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जाता. त्यावेळी जेवण पाहून तुम्ही ओवरइटिंग करता. त्यामुळे घरातून थोडसं खाऊन रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी जा. फळं, एखादी चपाती, दही यांसारखे पदार्थ खाऊ शकता.
मेन्यूमध्ये हेल्दी पदार्थांची निवड करा
कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधी थोडासा रिसर्च करा. त्याच रेस्टॉरंट्सची निवड करा जेथे नॉर्मल, साधे आणि हेल्दी पदार्थ मिळत असतील, मेन्यूमधून स्वतःसाठी हेल्दी फूड ऑर्डर करा. शक्य तेवढं तळलेल्यास मसालेदार पदार्थांपासून दूर रहा. तसेच लवकर ऑर्डर करा त्यामुळे इतरांच्या टेबलवरील पदार्थ पाहून तुम्हाला फऊड क्रेविंग होणार नाही.
गोड पदार्थांचं सेवन कमी करा
रेस्टॉरंटमध्ये अनेकदा लोक जेवणानंतर काही ना काही स्वीट डिस ऑर्डर करतात. त्यामुळे तुम्हीही स्वतःसाठी काहीतर ऑर्डर करू शकता. खरं तर वजन कमी करण्यासाठी अजिबातच गोड खाऊ नये असं अजिबात नाही. तुम्ही तुमच्या आवडीची मिठाई किंवा चॉकलेट कमी प्रमाणात खाऊ शकता. डाएट प्लॅनमध्येही जास्त दिवसांच्या अंतरावर कमी प्रमाणात खाऊ शकता. मिठायांपैकी एक मिठाई खाल्याने काही खास नुकसान होत नाही.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.