डोकं पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी करा ‘हेड, बॉडी मसाज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:34 PM2017-12-28T16:34:55+5:302017-12-28T16:39:04+5:30

नकारात्मक विचार घालवून रिफ्रेश होण्यासाठी काय कराल?

If you are full of negative thoughts, try 'Head, Body Massage'.. | डोकं पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी करा ‘हेड, बॉडी मसाज’!

डोकं पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी करा ‘हेड, बॉडी मसाज’!

Next
ठळक मुद्देआपल्या निराशाजनक मनस्थितीला पुन्हा ताळ्यावर आणायचं असेल, तर सर्वोत्तम उपाय म्हणजे डोक्याचा आणि शरीराचा मसाज.महिलांच्या बाबतीत मेनिक्युअर आणि पेडिक्युअरनंही चांगलाच फरक पडेल आणि एकदम फ्रेश वाटायला लागेल.निराशाजनक, त्रास देणाºया विचारांना येऊ द्या. त्यांना अडवू नका. अगदी तुम्हाला रडू आलं तरी मनसोक्त रडून घ्या. त्या भावनांना मुक्त वाट करून द्या.

- मयूर पठाडे

कधी कधी आपल्याला खूप काम पडतं. मरेस्तोवर काम. कधी हे काम संपेल आणि आपण त्यातून बाहेर पडू असं आपल्याला होतं. पण ते काम संपता संपत नाही आणि संपलं तरी त्याचं यायचं ते टेन्शन येतंच. हे टेन्शन मग आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. त्या टेन्शननं आपली कामगिरी बजावलेली असते आणि त्यामुळे आपल्या मूडचेही पार तीनतेरा वाजलेले असतात..
अशा वेळी फार काही न करता आपल्या मनस्थितीला पुन्हा ताळ्यावर आणायचं असेल, तर सर्वोत्तम उपाय म्हणजे डोक्याचा आणि शरीराचा मसाज. घरच्या घरी आपण स्वत:, आपल्या घरातील कोणी व्यक्तीनं किंवा अगदी सलूनमध्ये जाऊनच जर तुम्ही मसाज करून घेतला तर आणखीच उत्तम. या मसाजमुळे आपण खरोखरच रिलॅक्स होतो. आपला मूड ताळ्यावर येतो. एक अनामिक शांती आपल्याला लाभते. कधी आपण खूप टेन्शनमध्ये असलो आणि कामानं बेजार झालेलो असलो तर हा उपाय नक्की करून पाहा. तो तुम्हाला नुसतं रिलॅक्सच करणार नाही, तर तो तुम्हाला नवी ऊर्जा प्राप्त करून देईल आणि नव्या उमेदीनं तुम्ही आपलं काम करू शकेल.
महिलांच्या बाबतीत मेनिक्युअर आणि पेडिक्युअरनंही चांगलाच फरक पडेल आणि एकदम फ्रेश वाटायला लागेल. अगदीच काही नाही तर डोळे मिटून शांतपणे थोडावेळ पडून राहा. सगळ्या विचारांना आपल्या मनातून घालवायचा प्रयत्न करा. विचार असे सहजासहजी जात नाहीत, पण तरीही तुम्ही नक्कीच फ्रेश व्हाल.
टेन्शन आल्यावर दुसरा आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या निराशाजनक, त्रास देणाºया विचारांना येऊ द्या. त्यांना अडवू नका. त्यांच्यासाठी वाट मोकळी करून द्या. अगदी तुम्हाला रडू आलं तरी मनसोक्त रडून घ्या. त्या भावनांना मुक्त वाट करून द्या. आपल्या जवळच्या कोणा तरी व्यक्तीशी त्या विषयावर बोला. साचलेलं सगळं मळभ साफ झाल्यानं, मोरीत अडकलेला बोळा निघाल्यावर साचलेलं पाणी जसं सुसाट निघून जातं, तसंच या नकारात्मक भावनाही थोड्याच वेळात कुठल्या कुठे पळून जाईल..

Web Title: If you are full of negative thoughts, try 'Head, Body Massage'..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.