वजन कमी करत असाल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं, उलटे होतील परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 05:55 PM2021-06-25T17:55:37+5:302021-06-25T17:56:17+5:30
जर तुम्ही वजन घटवण्यासाठी दिवस आणि रात्र एक करून कष्ट करत असताना आहारामध्ये कोणत्या फळांचा समावेश करत आहात, याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.
निरोगी आरोग्यासाठी आहारात फळांचे जास्त प्रमाणात सेवन करणं लाभदायक असते, असा सल्ला आपण जवळपास सर्वांकडूनच ऐकत असतो. पण सर्वच प्रकारची फळे अधिक प्रमाणात खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही. विशेषतः जर तुम्ही वजन घटवण्यासाठी दिवस आणि रात्र एक करून कष्ट करत असताना आहारामध्ये कोणत्या फळांचा समावेश करत आहात, याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.
केळं
केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र केळ्यामध्ये केळीमध्ये पोटॅशियम, फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स असतात. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तसेच केळ्यात १५० कॅलरी असतात. त्यामुळे वजन वाढते.
अॅव्होकाडो
अॅव्होकाडो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असे फळ आहे. पण यामध्ये कॅलरीचं प्रमाणात जास्त आहे. एका मोठ्या अॅव्होकाडोमध्ये ३३२ ग्रॅम कॅलरी असतात. ज्यामुळे तुमचं वजन घटण्याऐवजी वाढण्यास सुरुवात होते. अॅव्होकाडोमध्ये फॅट्सही भरपूर प्रमाणात असतात. शिवाय, ज्यांची त्वचा अतिशय संवेदनशील आहे, त्यांनी शक्यतो अॅव्होकाडो खाऊ नये. कारण अॅलर्जी होण्याचा धोका आहे. अॅव्होकाडोमुळे यकृताच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. गरजेपेक्षा अधिक प्रमाणात हे फळ खाल्ल्यास पोटाच्याही समस्या उद्भवू शकतात.
मनुका
ताज्या द्राक्षांच्या तुलनेत मनुकांमध्ये उलट कॅलरींचं प्रमाण जास्त असते. यामुळे वजन घटण्याऐवजी तुमचं वजन जलद गतीनं वाढेल. वजन कमी करण्यासाठी मनुक्यांचं सेवन कमी प्रमाणात करावं.
द्राक्ष
द्राक्षामध्ये निसर्गतः साखरेचं प्रमाण अतिशय आहे. शिवाय भरपूर प्रमाणात फॅट्सही आहेत. यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर डाएटमध्ये द्राक्षांचा समावेश करू नका. १०० ग्रॅम द्राक्षांमध्ये अंदाजे 67 कॅलरी आणि 16 ग्रॅम साखरेचं प्रमाण असते. हे प्रमाण तुमच्या वजन वाढीसाठी पोषक आहे. द्राक्षांमुळे पचन प्रक्रियेवरही परिणाम होतो. जास्त प्रमाणात द्राक्षांचं सेवन केल्यास गॅसच्या समस्याही वाढतात.
आंबा
आपण दररोज अमरस, मिल्कशेक्स, ज्यूस, आंबा मलई, आईस्क्रीम खाल्ले तर तुमचे वजन वाढू शकते. आंब्यात जवळपास 150 कॅलरीज असतात. जास्त कॅलरी खाल्ल्यास वजन वाढू शकते. म्हणून आंबे खाल्ल्यानंतर दुसरे काही खाऊ नये.