नर्व्हस झालात, अस्वस्थ वाटायला लागलं तर करून पाहा हे सोप्पे उपाय..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:31 PM2017-12-28T16:31:14+5:302017-12-28T16:32:11+5:30
थोड्याच वेळात तुमचा मूड होईल नॉर्मल!
- मयूर पठाडे
अनेकदा कुठल्यातरी चिंतेनं आपल्याला घेरलं जातं. अचानक अस्वस्थ वाटायला लागतं, मनातू कसली तरी भीती दाटून येते. अस्वस्थ वाटायला लागतं, नर्व्हसनेस वाढतो, अनइझी व्हायला लागतं.. काय करायचं अशावेळी?
अर्थातच डॉक्टरांची मदत घेणं हा तर त्यावर सर्वोत्तम उपाय आहेच, पण बºयाचदा आपल्या या चिंतेला आपण स्वत:च आपल्यापासून दूर करू शकतो. या चिंता जशा अचानक आपल्याला घेरतात, तशाच काही मिनिटांमध्ये या अनामिक चितांना आपण पळवूनही लावू शकतो.
तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं, नर्व्हस वाटायला लागलं, तर आपल्याला कुठल्या तरी चिंतेनं ग्रासलं आहे, हे नाकारु नका. काहीतरी आपल्याला त्रास देतंय, हे तर खरंय, मान्य करा ते आणि सामोरं जा त्याला. या भावनेशी झगडा करू नका, त्याला प्रतिकार करू नका आणि अमान्यही करू नका. या भावनेशी युद्ध छेडाल, तर आणखीच त्रास होईल. त्यापेक्षा थोडा वेळ शांत बसा. स्वत:शीच संवाद साधा. ही स्थिती क्षणैक आहे आणि थोड्याच वेळात ती जाईल असं स्वत:ला बजावा.. बघा खरोखरच थोड्याच वेळात तुमचं नैराश्य आणि उदासिनता दूर होईल. अर्थातच लक्षात ठेवा, ही अस्वस्थता कशामुळे आहे, हे आपल्याला बºयाचदा स्वत:चं स्वत:लाच कळतं. हे कारण काही तरी फुटकळ आहे की गंभीर, तेही बºयाचदा लक्षात येतं. तसं नाही आलं लक्षात, तर मग मात्र डॉक्टरी सल्ला केव्हाही श्रेयस्कर.
तणावावर, चिंतेवर मात करण्याचा आणखी एक उत्तम उपाय म्हणजे ताणाच्या परिस्थितीतून बाहेर पडा. फिरायला, चालायला जा. दुसरं काही तरी काम करा. काहीतरी गंमतीशीर वाचा, पाहा. मोबाइलमधले फनी व्हीडीओज थोडा वेळ पाहा. ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला बरं वाटतं, असं काहीतरी करा. तणाव निर्माण करणाºया त्या परिस्थितीतून स्वत:ला पूर्णपणे बाहेर काढा. थोड्याच वेळात तुमचा मूड नॉर्मल होईल..