कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल तर, बेहडा ठरेल गुणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:37 PM2018-09-09T15:37:03+5:302018-09-09T15:45:54+5:30

ऐन उन्हाळ्यात बेहड्याचा फुलारो लक्ष वेधून घेतो. बेहडाचा औषधी गुणधर्म मुख्यत: त्याच्या फळांमध्ये असतो. बेहड्याला भरपूर फळे लागतात.

If you are suffering from dry cough, it will be very beneficial | कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल तर, बेहडा ठरेल गुणकारी

कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल तर, बेहडा ठरेल गुणकारी

googlenewsNext
ठळक मुद्दे नेत्ररोगावर बेहडा फळाची पावडर आणि साखर समप्रमाणात सेवन करावेबेहडा तेल हे सांधेदुखीवरही उपयोगी ठरते. बेहडाच्या बियांपासून तयार केलेले तेल उत्तम केशवर्धक

- भारतात सर्वत्र बेहडा जातीचा वृक्ष आढळतो. या वृक्षाचे मूळ उगमस्थान कोकण भाग आहे. त्रिफळा चूर्णामधील अविभाज्य घटक म्हणून बेहडा ओळखला जातो. हा वृक्ष मोठा विस्तारतो व सुमारे १०० फूट उंच वाढतो. या वृक्षाचे एक वैशिष्ट्य म्हणजे खोड सरळ उंच वाढल्यानंतर फांद्यांचा विस्तार पसरतो. झाडाच्या फांद्या चौफेर पसरलेल्या असल्यामुळे पूर्ण वाढ झालेला बेहडा वृक्ष डोळ्यांची पारणे फेडतो. हा पाणझडी वृक्षांच्या यादीत समाविष्ट होतो. या वृक्षाची पाने लांब आणि रुंद असतात. फांद्यांच्या टोकावर पाने गुच्छ स्वरूपात पहावयास मिळतात. साल भुरकट रंगाची असते. या वृक्षाची पानगळ जानेवारी महिन्यापासून होऊ लागते. बेहडाची फुले हिरवट पिवळसर रंगाची असून फुलांना उग्र वास असतो. मे महिन्यापासून बेहडा फुलण्यास प्रारंभ होतो. ऐन उन्हाळ्यात बेहड्याचा फुलारो लक्ष वेधून घेतो. बेहडाचा औषधी गुणधर्म मुख्यत: त्याच्या फळांमध्ये असतो. बेहड्याला भरपूर फळे लागतात. साधारणत: लागवडीनंतर दहा वर्षांपर्यंत फळधारणा होण्यास सुरुवात होते. फळ गोल अंडाकृती असून भुरकट रंगाची असतात. फेब्रुवारीपासून बेहड्याची फळे गळण्यास प्रारंभ होतो. फळांचा वरचा मांसल भाग औषधात वापरला जातो. फ ळामधील आठोळी फोडल्यानंतर गर मिळतो. हा गर खाण्यास चवीसाठी काजूसारखा लागतो. गर जास्त खाल्यास गुंगी येण्याची शक्यता असते. बेहडा पावडरचा उपयोग प्रामुख्याने घशाचे विकार व कफप्रधान विकारावर केला जातो. जुना श्वासोच्छवासाचा रोग, कोरडा खोकल्यावर बेहडा पावडर अत्यंत गुणकारी ठरते. कोरडा खोकल्याचा त्रास असल्यास बेहडा पावडर मधासोबत चाटण करून घ्यावे. पाचनशक्ती वाढविण्यासाठी जेवणानंतर बेहडा फळांची पावडर कोमट पाण्यासोबत घ्यावी. बेहडाच्या बियांपासून तेल काढण्यात येते. बेहडाच्या बियांपासून तयार केलेले तेल उत्तम केशवर्धक असून केस गळण्याच्या व विरळ होण्याच्या समस्येवर हे तेल उत्तम औषध ठरते. तसेच बेहडा तेल हे सांधेदुखीवरही उपयोगी ठरते. घशाची जळजळ होत असल्यास किंवा दाह जाणवत असल्यास बेहडाच्या फळाचे टरफल केवळ चघळले तरी आराम मिळतो. तसेच उचकी लागल्यास व ती लवकर न थांबल्यास बेहडा फळातील गर अल्प प्रमाणात घ्यावा. रक्ताची कमतरता भासल्यास सालीचे चूर्ण घ्यावे किंवा चूर्णाचा काढा बनवून घ्यावा. नेत्ररोगावर बेहडा फळाची पावडर आणि साखर समप्रमाणात सेवन करावे.

- कुसुम दहिवेलकर, सेवानिवृत्त वनधिकारी

 

Web Title: If you are suffering from dry cough, it will be very beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.