ऑफिसमध्ये ओवरटाईम करत असाल तर सावधान, पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 01:07 PM2019-12-21T13:07:42+5:302019-12-21T13:17:12+5:30

ऑफिसमध्ये खूप वेळ जागून काम करून तुम्हाला  बॉसच्या नजरेत चांगले राहायचे असते. त्यासाठी काहीवेळा तुम्ही  प्रयत्न करत असता.

If you are working overtime in the office it may risk of high blood pressure | ऑफिसमध्ये ओवरटाईम करत असाल तर सावधान, पडू शकतं महागात

ऑफिसमध्ये ओवरटाईम करत असाल तर सावधान, पडू शकतं महागात

Next

ऑफिसमध्ये खूप वेळ जागून काम करून तुम्हाला बॉसच्या नजरेत चांगले राहायचं असतं. त्यासाठी काहीवेळा तुम्ही प्रयत्न करत असता. तुमच्या अशा वागण्यामुळे ऑफिसमध्ये नक्कीच फायदा होईल. तसंच तुम्हाला प्रमोशन सुध्दा मिळू शकतं. पण या सवयींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. कारण ऑफिसमध्ये लॉगिन अवर्सपेक्षा जास्तवेळ काम केल्याची सवय असल्यास गंभीर स्वरुपाचे आजार होऊ शकतात. यामुळे हायपरटेंशन म्हणजेच रक्तदाबासंबंधी समस्या उद्भवू शकतात. 

एका आठवड्यात जर तुम्ही ४९ तासांपेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये काम करण्यासाठी थांबत असाल तर उच्च रक्तदाबाचा धोका उद्भवू शकतो.  ५ वर्किंग दिवसांप्रमाणे रोज दहा तास ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये रक्तदाब वाढण्याचा धोका ६६ टक्क्यांनी अधिक असतो. 
या संबंधी एक रिसर्च करण्यात आला  होता. त्यात असं दिसून आलं की ओवरटाईम करणाऱ्या लोकांना आजार होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. या रिसर्चसाठी कॅनडामधील ३ पब्लीक इंस्टिट्यूशन्समध्ये ३ हजार ऑफिसवर्क करत असलेल्या कर्मचारी वर्गाचे निरिक्षण करण्यात आले होते. जवळपास ५ वर्ष या लोकांवर नजर ठेवण्यात आली होती.

दरम्यान यात सहभागी असलेल्या सर्व लोकांना मॉनिटरींग डिवाईस घालून ठेवण्यात आलं होतं. ज्यात त्यांच रेग्युलर रिडिंग रेकॉर्ड केलं जातं होतं. या रिसर्चमध्ये त्या व्यक्तींचं शिक्षण, ऑक्यूपेशन, स्मोकिंग स्टेटस, बीएमआय, कामाच्या तणावाची पातळी या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या होत्या. त्यांनुसार मास्क्ड हायपरटेंशन सारख्या समस्या त्या व्यक्तींना हृद्याच्या आजाराजवळ घेऊन जात असल्याचे दिसून आले.

कॉर्पोरेट ऑफिसमध्ये  कर्मचारी वर्गाला तासनतास एकाच जागी बसून काम कराव लागतं. त्यामुळे वेगवेगळे आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जे एकाच जागी बसून काम करतात. त्यांनी १० मिनिटं वेळ काढून वर्कआऊट करायला हवं. त्यामुळे आजारपणापासून दूर राहता येत. नाहीतर हृदयाशी संबंधीत गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यात मधुमेह, रक्तदाब, तसंच मानसिक आजार होण्याची सुध्दा संभावना असते.

Web Title: If you are working overtime in the office it may risk of high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.