रडाल तर वाचाल, चक्क रडण्याचे असतात फायदे...वाचून म्हणाल, 'आय लव्ह टिअर्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 04:36 PM2021-07-08T16:36:53+5:302021-07-08T16:41:11+5:30

मनमोकळेपणानं हसल्यानं आरोग्य सुधारतं हे तर प्रत्येकाला माहीत आहे. हसणं हे आरोग्यासाठी जितकं फायद्याचं आहे, तितकंच रडणंही आरोग्यासाठी महत्वाचं आहे. जाणून घ्या रडण्याचे फायदे...

If you cry, it will help, there are many benefits of crying .... you will not believe after reading | रडाल तर वाचाल, चक्क रडण्याचे असतात फायदे...वाचून म्हणाल, 'आय लव्ह टिअर्स'

रडाल तर वाचाल, चक्क रडण्याचे असतात फायदे...वाचून म्हणाल, 'आय लव्ह टिअर्स'

googlenewsNext

मनमोकळेपणानं हसल्यानं आरोग्य सुधारतं हे तर प्रत्येकाला माहीत आहे. हसणं हे आरोग्यासाठी जितकं फायद्याचं आहे, तितकंच रडणंही आरोग्यासाठी महत्वाचं आहे. जाणून घ्या रडण्याचे फायदे...
बसल टीअर्स
हे अश्रू आपण जेव्हा डोळ्यांची उघडझाप करतो तेव्हा येतात. यांच्यामुळे डोळ्यात कोरडेपणा राहत नाही तर आद्रता राहते.
भावनात्मक अश्रू
भावनात्मक अश्रु म्हणजे ज्या वेळेस माणसाला किंवा त्या व्यक्तीला खूप दुःख झाले असते किंवा खूप आनंद झालेला असतो त्या भावनांमध्ये त्याला आपोआप रडू येते. ते रडू म्हणजेच भावनात्मक अश्रु.
प्रतिक्रिया अश्रू
प्रतिक्रिया अश्रू म्हणजेच आपल्या शरीरातील संरक्षण यंत्रणा आहे किंवा किंवा रस्त्याने जाताना आपल्या डोळ्यात केले तर आपल्या डोळ्यात पाणी येते याला आपण प्रतिक्रिया अश्रू म्हणू शकतो. 


रडण्याचे फायदे

  1. रडल्यामुळे ताणतणाव दूर होतो. त्यामुळं मूडही चांगला राहतो. अनेकजण आपल्याला आलेला राग आणि ताण लपवण्याचा प्रयत्न करतात. परंतु पुढं जाऊन या सगळ्याला भयंकर रूप प्राप्त होते. ताणतणावापासून मुक्त व्हायचं असेल आणि रडू येत असेल तर मनमोकळेपणानं रडायला हवं
  2. ताण-तणावामुळं रडू कोसळणं व डोळ्यांना होत असलेल्या त्रासामुळं डोळ्यातून पाणी येणं, यात फरक असतो. जेव्हा आपण रडतो तेव्हा शरीरातून एन्ड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक आणि ल्युसिन नावाचे स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतात.
  3. अश्रू डोळ्यातील मेमब्रेनला सुकू देत नाहीत. मेमब्रेन सुकल्यानं दृष्टीत फरक पडतो. त्यामुळं माणसाला कमी दिसू लागते. मेमब्रेन योग्य असेल तर बऱ्याच काळापर्यंत दृष्टी चांगली राहते.
  4. अश्रूंमध्ये लाइसोजाइम नावाचं तत्व असतं. त्यामुळं बाहेरील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळं डोळ्यांना संसर्ग होत नाही. तसंच, डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं. पण फक्त रडल्यामुळेच हे तत्त्व अश्रूंद्वारे डोळ्यातून बाहेर पडतं.
  5. रडण्यामुळे मनातील निराशा बाहेर पडते. यामुळे मन साफ होते. मेंदू, ह्रद्य योग्य पद्धतीने काम करते.

Web Title: If you cry, it will help, there are many benefits of crying .... you will not believe after reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.