प्रयत्न करुनही झोप येत नसेल तर वापरा या खास टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 12:01 PM2018-09-21T12:01:24+5:302018-09-21T12:02:08+5:30
अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी अनेक प्रयत्न करुनही झोप येत नाही. काहींना काही गोष्टींचं टेन्शन असतं तर काहींना आरोग्यासंबंधी काही समस्या असू शकतात.
अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी अनेक प्रयत्न करुनही झोप येत नाही. काहींना काही गोष्टींचं टेन्शन असतं तर काहींना आरोग्यासंबंधी काही समस्या असू शकतात. पण झोप पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवसातील सगळी कामे रखडू शकतात हेही तितकच खरं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला झोप येण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुम्हाला नक्की झोप येईल.
१) योगाभ्यासाने ब्लड प्रेशर नियंत्रित होऊन शरीर शांत होतं. जर तुम्ही योगाभ्यास करण्यासाठी वेळ काढू शकत नसाल तर झोपण्यापूर्वी ५ मिनिटे वेळ काढा. या ५ मिनिटांमध्ये तुम्ही एका नाकपुडीने श्वास घ्या आणि दुसऱ्या नाकातून श्वास बाहेर सोडा. हे केल्यानंतर काही वेळाने तुम्हाला शांत झोप येईल.
२) जर तुम्ही बेडवर झोपले आहात आणि विचार करत आहात म्हणजे तुम्हाला मानसिक किंवा शारीरिक तणाव असू शकतो. अशात शरीर पूर्णपणे सैल सोडा आणि विचार करणे बंद करा. काही वेळातच तुम्हाला झोप येईल.
३) जर तुम्हाला प्रयत्न करुनही झोप येत नसेल तर डोळे उघडा आणि मनातल्या मनात असा विचार करा की, आज मला झोपायचे नाहीये. काही वेळाने तुम्हाल आपोआप झोप येईल.
४) रात्री झोप येत नसेल तर तुम्ही दिवसभरात काय केले हे आठवा. काही वेळाने तुम्हाला गार झोप लागेल.
५) एखाद्या गोष्टीबाबत विचार करत असाल तर ती व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. काही वेळाने आपोआप तुम्हाला झोप येईल.
६) झोप येत नसेल तर डोळे बंद करा आणि खांदे सैल सोडा. विचार करणे बंद करा. तोंड बंद करा आणि नाकाने श्वास घ्या. या प्रक्रियेने तुम्हाला काही वेळातच झोप येईल.
७) दुसऱ्या दिवशी काय काय कामे करायची आहेत याचा विचार करा. खूपसाऱ्या कामांची यागी पाहून तुमचा मेंदू स्वत:हून झोपण्याचा संकेत देईल.