7 तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात! अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:40 AM2024-09-19T11:40:25+5:302024-09-19T11:40:58+5:30

प्रौढांनी दररोज रात्री सात तासांपेक्षा जास्त झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

If you don't get 7 hours of sleep, you are in the danger zone! Fear of premature death, heart attack, depression | 7 तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात! अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती

7 तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात! अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती

लँकेस्टर : रात्री झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी सर्वांनाच थकवा आणि अस्वस्थता जाणवत राहते. जास्त वेळ झोप न घेता राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

प्रौढांनी दररोज रात्री सात तासांपेक्षा जास्त झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरेशी झोप न मिळाल्याने नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

आजारी पडण्याचे प्रमाण वाढतेय

झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत करते. त्यामुळे आपल्याला आजार होण्याची अधिक शक्यता असते.

जसजसे आपण झोपेशिवाय राहतो तसससे आपण वास्तविक जगापासून लांब गेल्याची आणि संभ्रमात राहण्याची शक्यता वाढते.

१९८६

मध्ये ४५३ तास म्हणजे सुमारे १९ दिवस झोप न काढणाऱ्या रॉबर्ट मॅकडोनाल्डच्या नावावर गिनीज बुकमध्ये या विश्वविक्रमाची नोंद आहे.

नेमके काय होते?

झोप हा आपल्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. झोप आपल्या शरीरातील अनेक यंत्रणांना आराम करण्यास आणि त्या नीट करण्यास, तसेच होणारे नुकसान टाळण्यासाठी सक्षम करते.

झोप न घेतल्याने एकाग्रता कमी होण्याव्यतिरिक्त डोळे सुजणे, काळी वर्तुळे, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळ, लवकर निर्णय घेण्यास अक्षम होणे अशी लक्षणे दिसतात.

रात्रीची शिफ्ट नकोच

या लक्षणांवर मात करण्यासाठी अनेक लोकांना अनेक दिवस किंवा आठवडे लागू शकतात. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना अनेकदा झोपेच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. रात्रीच्या शिफ्टमधील कामगार दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांपेक्षा दररोज एक ते चार तास कमी झोपतात. यामुळे त्यांच्या अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो, असे लँकेस्टर विद्यापीठाचे ॲडम टेलर यांनी म्हटले आहे.

Web Title: If you don't get 7 hours of sleep, you are in the danger zone! Fear of premature death, heart attack, depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य