..तर मग तुमचं स्वत:चं नावही तुम्हाला आठवणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 05:50 PM2017-08-09T17:50:46+5:302017-08-09T17:51:37+5:30

मध्यम वयातले आजार उत्तरायुष्यात करतील आयुष्याचा खेळ!

if you dont respect your body, you cant even remember your name.. | ..तर मग तुमचं स्वत:चं नावही तुम्हाला आठवणार नाही..

..तर मग तुमचं स्वत:चं नावही तुम्हाला आठवणार नाही..

Next
ठळक मुद्देतरुण वयातलं दुर्लक्ष मध्यमवयात आणि मध्यमवयातील दुर्लक्ष म्हातारपणात त्रास देईल.डायबेटिस, ब्लड प्रेशर यासारखे विकार स्मृतिभंशाकडे घेऊन जातील.डिमेन्शिया, हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर या साºयाच गोष्टींचा एकमेकांशी संबंध.

- मयूर पठाडे

आपल्या तब्येतीकडी आपण किती लक्ष देतो? खरं तर कधीच नाही. अगदी रोज नियमित व्यायाम करणारे, जास्त कॅलरीज आपल्या शरीरात जाऊ नयेत म्हणून कायम दक्ष असणारेही आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत नाहीत.
..पण हे खरं आहे..
उदाहरणाथ.. गरम पाणी पिणं शरीराला चांगलं आहे, म्हणून दिवसभर, येताजाता पाणीच पित राहतील. खाणार काहीच नाहीत. तेल आरोग्याला घातक आहे, मग पोटात थेंबभर तेल गेलं तरी लगेच यांना अस्वस्थ व्हायला लागणार आणि वजनकाट्यावर जाऊन उभं राहाणार.. माझं वजन वाढलं की काय?
महिलांच्या बाबतीत तर हे प्रकारच जास्तच होतात. पुरुषही ‘काय होतं? जो होगा वो देखा जाएगा..’ असं म्हणून आपल्या तब्येतीकडे दुर्लक्षच करतात. पुन्हा सांगणाºयालाच ते उदाहरणं देतात.. तो बघा, अमूक ढमूक.. किती वर्षं झाली तो रोज दारु पितोय.. आणि हा बघा, सिगारेटची दोन पाकिटं रोज संपवतो.. कसला कॅन्सर आणि कसलं काय.. कसला टणटणीत आहे की नाही? आणि परवा तो डॉक्टर वारला.. ते तर रोज व्यायाम करीत होते, चांगले स्पोर्टसमन होते, सुपारीच्या खांडाचंही व्यसन त्यांना नव्हतं, तरीही पस्तिशीतही त्यांची भूलोकीवरची यात्रा आवरली की नाही?..
पण या कारणांमध्ये काही तथ्य नसतो.
शास्त्रज्ञांनी नुकताच एक अभ्यास केला आहे, त्यात त्यांना आढळून आलं आहे, तरुण वयात जर तुम्ही स्वत:च्या शरीराकडे लक्ष दिलं नाही, तर त्याचा त्रास तुम्हाला मध्यमवयात होतील. आणि अर्थातच त्याचे दुष्परिणाम तुम्हाला म्हातारपणात भोगावे लागतील.
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, मध्यमवयात जर तुम्हाला डायबेटिस, ब्लड प्रेशर यासारखे विकार असतील आणि पुन्हा तुम्ही धुम्रपानही करीत असाल, तर आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्हाला डिमेन्शियाचा आणि स्मृतिभंशाचा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
डिमेन्शिया, हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर या साºयाच गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे आणि त्यात काही गडबड झाली तर स्मृतिभं्रशाकडे तुमची वाटचाल होऊ शकते.
त्यामुळे तुम्ही जर आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नसाल, तर तातडीनं आपली लाइफस्टाइल बदला, संभाव्य विकारांपासून स्वत:ला वाचवा आणि मस्त, मजेत आयुष्य जगा..

Web Title: if you dont respect your body, you cant even remember your name..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.