पाणी कमी पित असाल, तर तुम्हाला जडू शकतं साखरेचं व्यसन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:59 PM2017-09-15T18:59:06+5:302017-09-15T19:05:49+5:30

‘गोडघाशा’ ही कौतुकाची नाही, चिंता करण्याचीच गोष्ट आहे!

If you drink less water, then you can have sugar craving ! | पाणी कमी पित असाल, तर तुम्हाला जडू शकतं साखरेचं व्यसन!

पाणी कमी पित असाल, तर तुम्हाला जडू शकतं साखरेचं व्यसन!

Next
ठळक मुद्देआपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपल्याला साखर खावीशी वाटते. त्यामुळे आपलं शरीर डिहायड्रेटेड राहाणार नाही, याकडे कटाक्षानं लक्ष द्या.बराच वेळ उपाशी राहाण्यानं किंवा दिवसातून दोन- तिनदाच खात असाल तरीही शरीर साखरेची मागणी करतं.साखर खाण्याची इच्छा कमी करायची असेल तर ‘सी व्हेजिटेबल’ हा त्यावरचा उत्तम उपाय आहे.शरीरातील साखरेचं प्रमाण नेहमी स्थिर ठेवायला हवं. त्याचं प्रमाण अगदी कमी किंवा अगदी जास्त होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं.

- मयूर पठाडे

‘गोडघाशा’ म्हणून आपण अनेकांचं कौतुक करतो. आपलं मूल जर खूप गोड खात असेल किंवा त्याला गोडाची फार आवड असेल तर विशेषत: आई त्या मुलाचं ‘गोडघाशा’ म्हणून इतकं काही कौतुक करते की बस! त्याला आवडतं म्हणून ती मुलाला मग सारखं गोडधोड करून खाऊदेखील घालत असत. त्यानं ती किती कृतकृत्य होत असते! पण अति साखर खाण्यानं आणि मुलाच्या या साखरवेडाला हातभार पुरवल्यानं आपलं मूल किती गंभीर समस्यांना भविष्यात सामोरं जाऊ शकतं याची त्या बिचाºया माऊलीला काही कल्पनाच नसते.
त्यामुळे अति गोड खाण्याचा आणि तेही सातत्यानं खाण्याचा मोह आपल्याला सोडायलाच हवा. घरात जर कुणाला अशी सवय असेल तर त्या सवयीचं व्यसनात रुपांतर होणार नाही याकडेही कटाक्षानं लक्ष द्यायला हवं.
साखरेची गोडी लागण्यात आणि साखर खावीशी वाटण्यातही अनेक घटक कारणीभूत असतात.
१- एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की, बºयाचदा आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपल्याला साखर खावीशी वाटते. त्यामुळे आपलं शरीर डिहायड्रेटेड राहाणार नाही, याकडे कटाक्षानं लक्ष द्या. वेळच्या वेळी आणि पुरेसं पाणी आपल्या शरीराला मिळायलाचं हवं. ते मिळालं नाही की मग आपलं शरीर साखरेची, गोडाची मागणी करतं आणि मग साखरेची चटक लागत जाते. आपण जास्त गोड खातोय, ते आपल्याला आवडतं म्हणून हे कारण प्रत्येक वेळी खरं असेलच असं नाही. शरीरातील पाण्याची कमतरता हेदेखील त्याचं कारण असू शकतं.
२- तुम्ही बराच वेळ उपाशी राहात असाल, दिवसातून दोनदा किंवा तिनदाच खात असाल तरीही शरीर साखरेची मागणी करतं. या दोन्ही तिन्ही वेळा तुम्ही अगदी भरपेट जेवत असला, तरीही असं होऊ शकतं. त्यामुळे रोज जेवढं आपण जेवतो, आपल्या शरीराला जेवढ्या अन्नाची गरज आहे, तेवढं अन्न आपण दिवसात पाच-सहा वेळा विभागून खाल्लं तर गोड पदार्थ खाण्याची आपली इच्छा नक्कीच कमी होईल.
३- आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण नेहमी स्थिर ठेवायला हवं. त्याचं प्रमाण अगदी कमी किंवा अगदी जास्त होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं.
४- साखर खाण्याची इच्छा जर आपल्याला वारंवार होत असेल तर त्यावर सी व्हेजिटेबल हा उत्तम उपाय आहे. नैसर्गिकरित्या त्यामध्ये खनिजं भरपूर प्रमाणात असतात. साखरेची लहर त्यामुळे उफाळून येणार नाही.
आपलं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर सुरुवातीपासूनच अति गोड खाण्यावर आपण नियंत्रण राखायला हवं. तुम्ही जर अति गोड आणि नेहेमी खाणाºयातले नसलात, तर काही धोका नाही, त्यासाठी साखरेला अगदी रामरामच केला पाहिजे असंही नाही, पण या गोडाची वाटचाल मात्र न्याहाळतच राहायला हवी.



 

Web Title: If you drink less water, then you can have sugar craving !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.