सावधान! एकाच बॉटल किंवा ग्लासने अनेकदा पाणी पिता? होऊ शकतो गंभीर आजाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 10:02 AM2023-12-06T10:02:47+5:302023-12-06T10:03:21+5:30

Health Tips : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एकाच भांड्याने अनेकवेळा पाणी प्यायल्याने शरीरात अनेक आजार घर करतात.

If you drink water from the same bottle multiple times you may have to face vomiting and diarrhea | सावधान! एकाच बॉटल किंवा ग्लासने अनेकदा पाणी पिता? होऊ शकतो गंभीर आजाराचा धोका

सावधान! एकाच बॉटल किंवा ग्लासने अनेकदा पाणी पिता? होऊ शकतो गंभीर आजाराचा धोका

Health Tips : दररोज भरपूर पाणी पिणं आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी फार महत्वाचं असतं. दिवसातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. अशात अनेकदा असं होतं की, आपण एकाच ग्लासने अनेकदा पाणी पितो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एकाच भांड्याने अनेकवेळा पाणी प्यायल्याने शरीरात अनेक आजार घर करतात.

आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना हे माहीत असेल की, आपल्या शरीराचा 70 टक्के भाग हा पाण्यापासून बनलेला असतो आणि अशात हेही तेवढंच सत्य आहे की, आपल्या चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणं फार महत्वाचं आहे. 

बरेच लोक रोज एकाच ग्लासने किंवा एकाच बॉटलने अनेकदा पाण पितात. याचं कारण केवळ आळस नाही तर माहितीचा अभाव हेही असू शकतं. बऱ्याच लोकांना हे नसेल माहीत की, एकाच भांड्यातून पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं.

जर एकाच ग्लासने अनेकदा पाणी पित असाल तर ग्लासच्या वरच्या भागावर घातक बॅक्टेरिया जमा होतात आणि त्याच ग्लासने पुन्हा पाणी प्यायल्याने बॅक्टेरिया पोटात जातात. ज्यामुळे उलटी आणि जुलाब यासारख्या समस्या होऊ शकतात.

इतकंच नाही तर एकदा वापरलेला ग्लास किंवा बॉटल तसे स्वच्छ दिसतात पण यामुळे आपल्या शरीरात अनेक गंभीर आजारही होऊ शकतात.

काय करावा उपाय

ग्लास साबण आणि पाण्याने चांगला स्वच्छ करावा. ग्लासच्या वरच्या भागाला चांगलं घासून स्वच्छ करा. कारण वरच्या भागावरच आपण ओठ लावून पाणी पितो आणि यामुळे आपल्या शरीरातील काही बॅक्टेरिया ग्लासच्या वरच्या भागावर चिकटतात. जे नंतर व्हायरसचं रूप घेतात.

पाण्याची बॉटल, जार किंवा कंटेनर नियमितपणे स्वच्छ करा. पाणी पिण्यासंबंधी जेवढी भांडी तुम्ही वापरता ती चांगली स्वच्छ ठेवा.

Web Title: If you drink water from the same bottle multiple times you may have to face vomiting and diarrhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.