सावधान! रात्री खूप तहान लागत असेल तर 'या' आजाराचे आहेत संकेत; करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:51 PM2024-08-05T12:51:36+5:302024-08-05T13:00:21+5:30

जर तुम्हाला रात्री पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर त्या गोष्टीला हलक्यात घेऊ नका.

if you feel excessive thirst at night learn what it could indicate | सावधान! रात्री खूप तहान लागत असेल तर 'या' आजाराचे आहेत संकेत; करू नका दुर्लक्ष

सावधान! रात्री खूप तहान लागत असेल तर 'या' आजाराचे आहेत संकेत; करू नका दुर्लक्ष

आपल्याला रात्री अनेकदा पुन्हा पुन्हा तहान लागते त्यामुळे आपली झोपही डिस्टर्ब होते. जर तुम्हाला नेहमीच रात्री जास्त तहान लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. पुन्हा-पुन्हा तहान लागण्यामागे अनेक कारणं असू शकतात, हे काही गंभीर आजारांची लक्षणं देखील असण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला रात्री पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर त्या गोष्टीला हलक्यात घेऊ नका.

मधुमेहाचे संकेत

रात्री जास्त तहान लागण्याचं सर्वात सामान्य कारण मधुमेह असू शकतो. जेव्हा शरीरातील साखरेची पातळी वाढते, तेव्हा किडनी ते काढून टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि तहान लागते.

डिहायड्रेशन

जर तुम्ही दिवसभर पुरेसे पाणी प्यायले नाहीत तर तुमच्या शरीराला रात्री जास्त पाण्याची गरज भासू शकते. यामुळे रात्री पुन्हा पुन्हा तहान लागू शकते. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.

झोपेमध्ये समस्या

झोपेच्या समस्या, जसं की स्लीप एपनिया, सुद्धा रात्री तहान लागण्यामागचं कारण आहे. स्लीप एपनियामध्ये श्वासोच्छवास थांबण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे तोंड कोरडे होते आणि तहान लागते. या समस्येमध्ये झोपताना श्वासोच्छ्वास वारंवार थांबतो, त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि तोंड कोरडं पडू लागतं. त्यामुळे रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि झोपही नीट होत नाही. 

काही औषधांचा प्रभाव

काही औषधे, जसं की डाययूरेटिक्स किंवा एंटीडिप्रेसेंट्स देखील तहान वाढवू शकतात. तुम्ही असं कोणतंही औषध घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उपाय आणि खबरदारी

- दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या म्हणजे रात्री तहान लागणार नाही.
- जर तुम्हाला सतत तहान लागत असेल तर तुमची ब्लड शुगर लेव्हल तपासा.
- चांगली झोप घ्या आणि तुम्हाला स्लीप एपनिया असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- योग्य आणि संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये फळे आणि भाज्या पुरेशा प्रमाणात असतील.
- तहान लागण्याची समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि संपूर्ण तपासणी करून घ्या.
 

Web Title: if you feel excessive thirst at night learn what it could indicate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.