ऑफिसमध्ये सतत झोप येते का? 'ही' असू शकतात कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:03 PM2018-08-23T15:03:55+5:302018-08-23T15:05:51+5:30

बऱ्याचदा आपण तयारी करून घाईगडबडीमध्ये ऑफिसला जातो. पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो. समोर कामाचा कितीही लोड असला तरीही झोप आवरता येत नाही.

If you feel like sleepy in office notice these reason | ऑफिसमध्ये सतत झोप येते का? 'ही' असू शकतात कारणं!

ऑफिसमध्ये सतत झोप येते का? 'ही' असू शकतात कारणं!

googlenewsNext

बऱ्याचदा आपण तयारी करून घाईगडबडीमध्ये ऑफिसला जातो. पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो. समोर कामाचा कितीही लोड असला तरीही झोप आवरता येत नाही. असं कधीतरी झालं तर ते सामान्य कारण असू शकतं. पण जर असं वारंवार होत असेल तर मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता तात्काळ यांची कारण जाणून घेणं घरजेचं असतं. जाणून घेऊयात यामागच्या कारणांबाबत....

कमी पाणी पिणं

पाण्याचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे आपल्याला माहीत आहेतच. अशातच जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर चिडचिड आणि थकवा जाणवू लागतो. त्यामुळे तुम्हाला झोप येऊ लागते. यावर उपाय म्हणून भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.

झोप अपूर्ण राहणं

जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तरीदेखील तुम्हाला थकवा जाणवू शकतो. तुम्हाला अनेकदा असं जाणवलंही असेल की, जेव्हा तुम्ही सुट्टीवर असता. त्यानंतर पुन्हा ऑफिसमध्ये आल्यानंतर थकवा जाणवू लागतो. त्यामुळे झोपही येते. यावर उपाय म्हणून तुम्ही लवकर झोपू शकता. त्यामुळे तुमची झोप पुर्ण होईल.

एनीमियामुळे वाढते कमजोरी

तुम्हाला येणाऱ्या झोपेचे एक कारण एनीमियाही असतं. जेव्हा आपल्या शरीरात रेड ब्लड सेल्सची कमतरता जाणवू लागते त्यावेळी एनीमियाची लक्षणं दिसू लागतात.  हे सेल्स आपल्या फुफुस्सांमार्फत शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी मदत करतात. एनीमिया आयर्न किंवा व्हिटॅंमिनच्या कमतरतेमुळे होतं. त्यामुळे शरीरात थकवा जाणवू लागतो. 

डिप्रेशनमुळे उडते झोप

जर तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तर ही तुमच्यासाठी काळजी करण्याचं कारण आहे. यामुळे तुम्ही स्वतःला कमजोर समजू लागता. सतत डिप्रशनमध्ये राहिल्याने तुम्हाला पूर्णवेळ झोप येत नाही त्यामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवतो. परिणामी तुम्ही सतत थकलेले आणि कमजोर दिसू लागता. 

Web Title: If you feel like sleepy in office notice these reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.