हृदयविकार, टेन्शन असेल, तर आधी तुमची झोप सुधारा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:54 PM2018-02-13T15:54:06+5:302018-02-13T15:57:32+5:30
कहीं पे निगाहें, कहीं पे निशाणा..
- मयूर पठाडे
वाट्टेल तेव्हा, वेळी अवेळी घेतलेली झोप नेहमीच अनारोग्याला आमंत्रण देते. पण या झोपेचा आपल्या आरोग्याशी नेमका संबंध तरी काय, हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक प्रयोगच केला.
‘सीडीसी’ (सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन) या संस्थेने तब्बल ५४ हजार लोकांचा अभ्यास केला. त्यात सारेच जण ४५ किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले होते.
या तपासणीत शास्त्रज्ञांना आढळलं, ज्या अभ्यास गटावर ही चाचणी घेण्यात आली, त्यातील ३२ टक्के लोक कमी झोपणारे होते. ६४ टक्के लोकांची झोप सर्वसाधारणपणे योग्य म्हणावी अशी होती, तर चार टक्के लोक हे गरजेपेक्षा जास्त झोपणाºयांतले होते.
शास्त्रज्ञांनी सांगितलं, ज्या व्यक्ती खूप कमी आणि खूप जास्त झोपणाºयांतल्या गटात होते, त्यांच्यात आरोग्याच्या तक्रारीही तुलनेनं खूपच जास्त होत्या. हृदयविकारापासून ते टेन्शन, लठ्ठपणा, वजनवाढ, डायबेटिस.. अशा अनेक समस्यांनी त्यांना घेरलेलं होतं. त्या तुलनेत ज्यांची झोप योग्य आणि पुरेशी होती, असे लोक मात्र बºयापैकी आरोग्यदायी होते आणि त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी खूपच कमी होत्या.
आजार जरी वेगगवेळे असले तरी त्याचा मूळ संबंध झोपेशी निगडीत होता, हेही त्यातून लक्षात आलं. त्यामुळे बºयाचदा चुकीची ट्रिटमेंट मिळते आणि मूळ आजार तसाच राहतो. म्हणजे हृदयविकाराचा त्रास असला, लठ्ठपणामुळे तुम्ही त्रासले असाल किंवा टेन्शनमुळे वैतागला असाल, तर बºयाचदा त्याच आजारावरची ट्रिटमेंट घेतली जाते, मात्र तरीही आजार तसाच राहतो. कारण त्याचं मूळ दुसºयाच कारणात असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांनी डॉक्टरांनाही सल्ला दिलाय, की असे आजार रुग्णांत आढळून आल्यनंतर तुम्ही पहिल्यांदा रुग्णाच्या झोपेची चौकशी करा आणि त्यावर इलाज करा..
त्यामुळे तुम्हाला हृदयविकार असेल, तर आधी तुमची झोप सुधारा..