दुपारी जेवणानंतर जर कराल 'या' चूका, तर वजन वाढेल भरभर...व्हाल लठ्ठ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 12:40 PM2021-07-11T12:40:56+5:302021-07-11T12:42:46+5:30
तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दुपारच्या जेवणानंतरच्या काही सवयी तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.
वजन वाढणं ही समस्या सध्याच्या जीवनशैलीमुळे सर्वसामान्य झाली आहे. त्यामुळे काहीजण वजन कमी करण्यासाठी डाएट करतात तर काही योगावर भर देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दुपारच्या जेवणानंतरच्या काही सवयी तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.
सॅलड खाणे
जर तुम्ही दुपारच्या जेवणात सॅलड खात असाल मात्र त्यानंतर चहा-कॉफी घेण्याची सवय असल्यास वजन वाढतं. त्यामुळे दुपारी जेवल्यानंतर काही गोष्टी टाळण्याचा सल्ला नेहमी तज्ज्ञ देतात. जाणून घेऊया या सवयींबद्दल.
दुपारी गोड पदार्थांचं सेवन
सकाळी व्यायाम केल्यानंतर काही प्रमाणात थोडं गोड खाल्लं तर चालू शकत. एखाद्या दिवशी गोड खाणं चालू शकते. पण दररोज गोड खाण्याची सवय त्रासदायक ठरू शकते. म्हणून दुपारच्या जेवणानंतर गोड खाणं टाळा.
दुपारी झोपणं
तुम्ही सकाळी व्यायाम करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर बसून राहालं. तुमच्या शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. दुपारी जेवल्यानंतर झोपणं किंवा डेस्कवर बसून राहणं योग्य ठरणार नाही. यासाठी काही वेळाने थोडं चाललं पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये टायमर लावू शकता.
उशिरा जेवणं
अवेळी जेवल्याने शरीरावर काही परिणाम होत नाही, फक्त हेल्दी खाणं गरजेचं असल्याचं अनेकांचा गैरसमज असतो. इंटरनॅशनल जनरल ऑफ ऑबेसिटीच्या अहवालानुसार, जे लोक दुपारी 3 नंतर जेवण घेतात त्यांचं वजन कमी होण्याची शक्यता कमी असते. कारण त्यामुळे मेटॅबॉलिझमच्या प्रक्रियेत अडथळे येतात.
दुपारी कॉफी पिणं
दुपारी ३ नंतर कॉफी पिणं योग्य ठरणार नाही. कॉफीमुळे अन्नपचनास मदत होत असली तरी जेवल्यानंतर लगेचच अॅसिडिक पदार्थांचं सेवन त्रासदायक ठरतं. त्याचप्रमाणे कॉफीमधल्या साखरेमुळे कॅलरीज वाढतात. मात्र जर तुम्हाला कॉफी घेण्याची सवय असल्यास जेवणानंतर 45 मिनिटांनी घ्या.